आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसाठी पोलिस पाटलाकडून एक लाखाची आर्थिक मदत

One lakh rupees financial assistance from the Police Patil for the suicidal families
One lakh rupees financial assistance from the Police Patil for the suicidal families

नाशिक, अंबासन : आई मोबाईल दे ना...बाबांना फोन लावायचा आहे...कुठे गेले असतील गं माझे बाबा...सांग ना आई, असे केविलवाणी आहे ती एक वर्षापुर्वी आत्महत्या केलेल्या आखतवाडे येथील किशोर बापू खैरनार या तरूण शेतक-याच्या कोवळ्या चिमुकल्यांची ज्यांना आजही माहिती नाही आपले बाबा या जगात नाहीत, वर्ष उलटले मात्र तरीही बाबा दिसत नसल्याने चिमुकल्यांची आईकडे बाबाबद्दल नेहमीच विचारणा होते. अतिशय हालाकीच्या परिस्थितीत हे कुटुंब उदरनिर्वाह करीत आहे. यांची चूनचून कुपखेड्याचे पोलिस पाटील बाळासाहेब ठाकरे यांना लागली आणि त्यांनी एक लाख रूपये दिले. जणू खैरनार कुटुंबियांसाठी देवदूत धावून आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

निसर्गाचा लहरीपणा व शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी देशोधडीला लागले तर काहींना शेतातील सर्व मार्ग खुंटल्याने आर्थिक विवंचनेच्या वैफल्यात अटकल्याचे चित्र आहे. दुष्काळी परिस्थिती, कर्जबाजारीपणा अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पाण्याचे दुर्भिक्ष, शेतीमालाला भाव नाही दुष्काळ, सततची नापिकी या सर्वांची झगडता झगडता बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथील तरूण शेतकरी किशोर बापू खैरनार याने मागील वर्षी स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.

आजच्या घडीला कुटुंबियांचा उदरनिर्वाह भयावह असून आखतवाडे येथील शेती तोडबटाईने दिली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती, विहिरीत पाणी नाही. यामुळे पिके जळून गेली आहेत. अशा परिस्थितीत आत्महत्याग्रस्त किशोर यांची पत्नी सोनाली यांनी मुलं धनश्री व जय यांना घेऊन चाचेर (ता.कळवण) येथील नणंदकडे राहून तेथेच एका शेतात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. हे सर्व करताना मुलं नेहमीच आपल्या बाबाबद्दल आईला विचारणा करीत आहेत. मुले आजही बाबा येतील या प्रतिक्षेत आहेत. नेहमीच आपल्या आईला मोबाईल लावून बाबांना बोलव बाबा खाऊ आणतील अशी केविलवाणी आईकडे करीत आहेत. हे पाहून अनेकांना गहिवरून येत असल्याचे चित्र आहे. ज्यावेळी किशोरने आत्महत्या केली तेव्हा कुपखेड्याचे पोलिस पाटील बाळासाहेब ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता.

परिस्थिती पाहून कुठलेही शब्द फुटत नसल्याचे सांगितले. त्यांनी स्वखुशीने एक लाख रुपये आखतवाडे येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोनाली यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव उपस्थित होते. त्यांचाही कंठ दाटून आला होता. त्यांनीही लगबगीने अकरा हजार देऊन गर्दीतल्या माणूस जागा केला. जणू खैरनार कुटुंबियांसाठी देवदूत धाऊन आल्याची चर्चा परिसरात होत आहे.      


''किशोरची घरची परिस्थिती अतिशय हालाकिची दिसली. कुटुंबियांची माहिती घेतानाच गहिवरून आले आणि आपणही मदत करावी असे ठरवले''.

- गणेश गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक जायखेडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com