चारचाकींच्या समोरासमोर धडकेत पादचारी ठार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नाशिक : सिटी सेंटर मॉलजवळ आज (ता. 25) सकाळी भरधाव वेगातील दोन चारचाकी वाहनांची धडक झाली. यावेळी रस्त्याने पायी जाणारे 53 वर्षीय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा दोन्ही वाहनांच्या मधे सापडून दूर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. सुभाष नाना गांगुर्डे (53, रा. शिवशक्‍ती चौक, डॉ. हेडगेवारनगर, सिडको) असे मृत इसमाचे नाव आहे. 

सिटी सेंटर मॉल चौफुलीच्या अलिकडे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास विचित्र अपघात घडला. सिटी सेंटर मॉलकडून गोंविदनगरच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी स्कॉर्पीओ वाहन (एमएच 15 डीओ 7007) आणि त्याचवेळी गोविंदनगरकडून येणारी इको स्पोर्ट कार (एमएच 12 केई 9025) या दोन वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. त्याचवेळी याच मार्गाने वनविभागाचे कर्मचारी सुभाष नाना गांगुर्डे हे रस्त्याने पायी जात होते. ते या दोन वाहनांच्या समोर सापडले. दोन्ही वाहनांच्या धडकेत ते जागीच ठार झाले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीसात दोन्ही वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत सुभाष गांगुर्डे हे श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी असल्याने समर्थ सेवेकऱ्यांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात होती. 

पोलिसांची भूमिका संशयास्पद 
सकाळी झालेल्या अपघातासंदर्भात सायंकाळपर्यंत मुंबई नाका पोलीसात गुन्हा दाखल नव्हता. पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतरही दोन्हीही वाहनांच्या चालकांचे नावे पोलिसांकहून दडविली जात होती. त्यामुळे याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांची भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात होता.

Web Title: one man killed in front of four-wheeler