मुरळीच्या वेशातील इसमाची पीएसआय पदमणे यांनी केली सुटका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

नांदगाव - काही दिवसांपासून गावात, शेतातल्या वस्तीवर वाड्यांवर चोर आल्याच्या अफवांनी ऊत आलाय त्यामुळे गावागावात दिसणाऱ्या अपरिचित व्यक्तींना व वाटसरूंना परस्पर मारहाण करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. असाच काहीसा प्रकार शनिवारी नांदगावच्या रेल्वे फाटकावर बघावयास मिळाला. वरून पुरुषी पेहराव मात्र आंतील कपडे महिलांचे, गळ्यात नकली दागिने व बाईसारखे मोठाले केस असलेल्या व्यक्तीला जमावाकडून मारहाण झाली. हा प्रकार सुरु असतांनाच पोलीस उपनिरीक्षक बी.यु.पदमणे हे तपासकामी जात असतांना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

नांदगाव - काही दिवसांपासून गावात, शेतातल्या वस्तीवर वाड्यांवर चोर आल्याच्या अफवांनी ऊत आलाय त्यामुळे गावागावात दिसणाऱ्या अपरिचित व्यक्तींना व वाटसरूंना परस्पर मारहाण करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. असाच काहीसा प्रकार शनिवारी नांदगावच्या रेल्वे फाटकावर बघावयास मिळाला. वरून पुरुषी पेहराव मात्र आंतील कपडे महिलांचे, गळ्यात नकली दागिने व बाईसारखे मोठाले केस असलेल्या व्यक्तीला जमावाकडून मारहाण झाली. हा प्रकार सुरु असतांनाच पोलीस उपनिरीक्षक बी.यु.पदमणे हे तपासकामी जात असतांना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी मारहाणहोत असलेल्या अनोळखी व्यक्तीची सुटका केली व त्याला सुरक्षित पोलीस स्टेशनला पोहचविले.

बागलाण तालुक्यातील धार्मिक जागरण कार्यक्रमात मुरळीचे काम करणारा तो कलाकार असल्याचे पुढे तपासात निष्पन्न झाले. मात्र जमावाकडून त्याला मारहाण झाल्याने ती व्यक्ती कमालीची भेदरलेली होती. बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या या व्यक्तीच्या पेहरावावरून त्याच्यावर संशय व्यक्त करीत काही जणांनी चौकशी केली. यादरम्यान काहींनी आपले हात साफ करून घेतले. या मराहणीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सध्या त्याची चर्चा सुरु आहे.

यात एकजण त्याचे केस ओढत असताना दिसत आहे. तो गयावया करतोय असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नांदगाव पोलिसांनी संशयित वाटणारे, मनोरूग्ण (वेडसर), भटके- फिरस्ते लोक, साधूवेशातील संशयित तसेच किरकोळ विक्री करणारे संशयित फेरीवाले यांना परस्पर मारहाण करू नका. प्रकार खरा की खोटा याची नागरीकांनी खात्री करावी व मेसेज कोणत्या ग्रृपवरून आला त्या ग्रृपच्या नावासह मेसेज पोलिसांना पाठवावा. तसेच सर्व पत्रकारांनीही अशा पोस्टची खात्री करून पोलिसांना कळवा व सहकार्य करा असे आव्हान केले आहे.

Web Title: one man Rescued by police