धोंड्याचा वाण घेण्यासाठी जाणाऱ्या जावयाचा अपघातात मृत्यू 

दीपक कच्छवा
बुधवार, 6 जून 2018

पिलखोड गावाचे जावई
पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी असलेले अरूण माळी व ज्ञानेश्वर माळी हे दोघेही पिलखोड येथील रतन पवार यांचे ते जावई होते.रतन पवार यांच्या दोन्ही मुली पांतोडा येथे दिलेल्या आहेत.त्या दोन्ही मुली धोंड्याला आपल्या माहेरी पिलखोड येथे आलेल्या होत्या आणि धोड्यांचा वाण घेण्यासाठी आज दोन्ही जावई एकाच गाडीवर पिलखोड येथे जातांना हा दुर्दैवी अपघात झाला.त्यामुळे पिलखोडसह पातोंडा गावावर शोककळा पसरली आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : पिलखोड(ता. चाळीसगाव) येथे सासुरवाडीला धोंड्याचा वाण घेण्यासाठी जाणाऱ्या पातोंडा(ता. चाळीसगाव) येथील जावयांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात एका जावयाचा जागेवर मृत्यू झाला तर, दुसरा जावई गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील  गुऱ्हाळ नाल्याजवळ घडली. दोघे जावई एकाच घरातले आहेत.

पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील अरूण नथू माळी ( वय 32 ) व  ज्ञानेश्वर शिवाजी माळी ( वय 40) दोन्ही साडु  दुचाकी( क्रमांक MH.19 cL.0478) वरून सासुरवाडी  पिलखोड येथे  धोड्यांचा वाण घेण्यासाठी जात होते.मात्र पिलखोड गावाजवळ असलेल्या गुऱ्हाळ नाल्याच्या वळणावर मालेगाव कडुन चाळीसगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या  ट्रक( क्रमांक MH 23 6686) ने जोरदार धडक दिली यात अरूण माळी जागीच ठार झाले तर दुसरा जावई  ज्ञानेश्वर माळी हा  गंभीर जखमी झाला.या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पिलखोड गावाचे जावई
पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी असलेले अरूण माळी व ज्ञानेश्वर माळी हे दोघेही पिलखोड येथील रतन पवार यांचे ते जावई होते.रतन पवार यांच्या दोन्ही मुली पांतोडा येथे दिलेल्या आहेत.त्या दोन्ही मुली धोंड्याला आपल्या माहेरी पिलखोड येथे आलेल्या होत्या आणि धोड्यांचा वाण घेण्यासाठी आज दोन्ही जावई एकाच गाडीवर पिलखोड येथे जातांना हा दुर्दैवी अपघात झाला.त्यामुळे पिलखोडसह पातोंडा गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: one person dead in accident near Chalisgaon