माळमाथा परिसरातील गावांत 'एक गाव, एक गणपती!

one village one ganpati in Malamatha parisar
one village one ganpati in Malamatha parisar

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) पोलिस स्थानकाच्या हद्दीतील 12 गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती' ही संकल्पना राबविण्यात येत असून निजामपूरात 7, तर जैताणेत 13 नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. 'एक गाव, एक गणपती' संकल्पनेत माळमाथा परिसरातील जांभोरे, टिटाणे, छडवेल(क), रुणमळी, वरसुस, ब्राम्हणवेल, नवापाडा, ऐचाळे, आमखेल, खुडाणे, रायपूर, कढरे आदी 12 गावांचा समावेश आहे.

'एक गाव एक गणपती' संकल्पनेतील गणेश मंडळे, गाव व अध्यक्ष याप्रमाणे :
न्यु गणेश मित्र मंडळ (जांभोरे) - अंकेश अहिरे, गणेश मित्र मंडळ (टिटाणे) - गोकुळ माळचे, जय बजरंग गणेश मंडळ, छडवेल(क) - विनायक बेडसे, एकता व एकलव्य गणेश मंडळ (वरसुस) - ईश्वर भामरे, सार्वजनिक गणेश मंडळ (ऐचाळे) - नानाभाऊ पानपाटील, सावता गणेश मंडळ (खुडाणे) - पराग गवळे, गणेश मित्र मंडळ (रायपूर) - गुलाब थोरात, गणेश मित्र मंडळ (कढरे) - दीपक राठोड, एक गाव एक गणपती (रुणमळी) - चंद्रकांत पाटील, ब्राह्मणवेल - श्याम नांद्रे, नवापाडा - रमेश बागुल, आमखेल - अरुण भिल आदी.

निजामपूरात 7 सार्वजनिक गणेश मंडळे असून त्यात आई तुळजा भवानी गणेश मंडळ, झुंजार गणेश मंडळ, युवक गणेश मंडळ, एकता गणेश मंडळ, सिद्धिविनायक गणेश मंडळ, नव-आदर्श गणेश मंडळ, न्यु एकता गणेश मंडळ यांचा समावेश आहे.

तर जैताणेत 13 नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळे असून त्यात राजमाता गणेश मंडळ, वीर एकलव्य गणेश मंडळ, द्वारकाधिश गणेश मंडळ, ओम साई गणेश मंडळ, सिद्धिविनायक गणेश मंडळ, कृष्णा गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ, मल्हार व्यायामशाळा गणेश मंडळ, सावित्रीबाई फुले गणेश मंडळ, महात्मा फुले व्यायामशाळा गणेश मंडळ, जय महाकाल गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, न्यु-अष्टविनायक गणेश मंडळ आदी गणेश मंडळांचा समावेश आहे.

निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक अनिल पाटील, कौतिक सुरवाडे आदींच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गृहरक्षक दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com