कांद्याच्या नव्या वाणाला मान्यतेची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

नाशिक - चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन तथा विकास प्रतिष्ठानतर्फे संशोधित केलेल्या कांद्याचे नवीन वाण केंद्रीय समितीच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. प्रतिष्ठानने एल-819 वाणाचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी समितीला पाठवला आहे. वाणाला मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या बिजोत्पादनाची प्रक्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांच्या हातात नवीन वाणाचे बियाणे पोचेपर्यंत किमान वर्षभराचा कालावधी अपेक्षित आहे.

एकरी 160 क्विंटलच्या आसपास उत्पादन मिळेल, अशा लाल 4- एल 744 वाणाचे प्रतिष्ठानतर्फे ीजोत्पादन सुरू करण्यात आले आहे. बीजोत्पादन करार पद्धतीने शेतकऱ्यांकडून करून घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बीजोत्पादनातून उपलब्ध होणाऱ्या या वाणाचे बियाणे राज्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात मिळणार आहे. यंदा कमी प्रमाणात नवीन वाणाचे बियाणे उपलब्ध होणार असून, पुढील वर्षापासून बियाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिष्ठानच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. प्रतिष्ठानतर्फे इतर वाणाचे बिजोत्पादन महाराष्ट्राबरोबर गुजरात, मध्य प्रदेशात केले जाते.

Web Title: onion permission