वेगाने उसळलेला कांदा धडक्यात गडगडला

वेगाने उसळलेला कांदा धडक्यात गडगडला

येवला - मागील आठवड्यात अचानकपणे उसळी घेऊन थेट २ हजार ५०० रुपयांपर्यंत धडकलेला उन्हाळ कांदा अचानकपणे ३५० ते ५०० रुपयांनी गडगडला आहे. वादळाच्या तडाख्यातून सुटून कर्नाटकमधील लाल कांद्याचा वाढलेला पुरवठा तसेच राजस्थानच्या लाल कांद्याचीही आवक वाढल्याने पुन्हा भाव उतरले आहे. मात्र भावात स्थिरता राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

गेले तीन ते चार महिने हजार रुपयांच्या आसपास असलेले बाजारभाव आणि पावसामुळे राज्यातील घटलेले पोळ कांद्याचे उत्पादन या कारणांनी अनेक शेतकर्यांनी नक्कीच भाव वाढतील या अपेक्षेने अजूनही कांदा चाळीतच ठेवला आहे.या अपेक्षेप्रमाणे मागील आठवड्यात अचानक कांद्याची लाली वाढली. परंतु तीनच दिवस वाढलेला भाव मागील तीन दिवसांत कमालीचा घसरला आहे.गत आठवड्यातील गुरुवार-शुक्रवारच्या बाजारभावाच्या तुलनेत आजचा जिल्ह्यातील बाजार समित्यातील भाव सुमारे ३५० ते ५०० रुपयांनी खाली आला आहे.

मागील आठवड्यात कर्नाटकमध्ये आलेल्या वादळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान होण्याची अपेक्षा होती.त्यामुळे पुन्हा कांद्याची देशावरची मागणी वाढून साहजिक भावही वाढले. मात्र हे वादळ तीन दिवसांतच थांबले आणि पुन्हा तेथील कांदा बाजारात येऊ लागला आहे.शिवाय राजस्थानमधील अलवर भागातील लाल कांदाही बाजारपेठेत येत असल्याने इकडील कांद्याच्या भावात पुन्हा उतार होताना दिसल्याचे येथील ज्येष्ठ कांदा व्यापारी नंदकुमार अट्टल यांनी सांगितले.

“हवामान खात्याने सहा दिवस वर्तवलेले कर्नाटकमधील वादळ तीनच दिवसात थांबले.यामुळे गृहित असलेले नुकसान टळले.आता पुन्हा नव्या लाल कांद्याचा पुरवठा पूर्ववत झाला असून आज कर्नाटकमधून सुमारे अडीच-तीन लाख गोण्या तर राजस्थानच्या अलवर मधून एक लाखाच्या आसपास गोण्या पुरवठा झाला आहे. असे असले तरी यापुढील काळात कांद्याच्या भावात २० ते २५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.”
-नंदकुमार अट्टल,कांदा व्यापारी व संचालक बाजार समिती,येवला

“शनिवारनंतर भाव कमी होऊ लागल्याने आवकेवर परिणाम झाला असून गेल्या आठवड्यात आठ ते दहा हजार क्विंटलपर्यंत होणारी आवक आज मात्र साडेचार ते पाच हजार क्विंटलवर आली असल्याचे बाजार समितीत चित्र होते. -कैलास व्यापारे,सचिव,येवला बाजार समिती

असे उतरत गेले बाजारभाव..
दिनांक - सर्वाच्च भाव - सरासरी
दि.२२ - १८७० - १३५०
दि.२० - १८८० - १६००
दि.१९ - २१८१ - १६५०
दि.१७ - २७०० - २१००
दि.१६ - २४३६ - १८५०
दि.१५ - १९४१ - १६००
दि.१३ - १५३६ - १२००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com