एक लाख क्विंटल कांद्याची उचल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

नाशिक - रेल्वेने दोन दिवसांमध्ये ७ रॅक उपलब्ध करून दिल्याने १ लाख १२ हजार क्विंटल कांदा पश्‍चिम बंगाल, बिहार, आसामकडे रवाना झाला. त्याचे सकारात्मक पडसाद भावावर उमटलेत. कांद्याच्या भावात क्विंटलला सरासरी २०० रुपयांनी वाढ झाली. नवीन कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव ५५० रुपयांच्या खाली घसरलेला होता. आज सरासरी ८०० रुपयांपर्यंत भाव शेतकऱ्यांना मिळाला. 

जिल्ह्यातील बाजारपेठेत दिवसाला दोन लाख क्विंटल कांद्याची आवक होत असून, हा कांदा देशांतर्गत पाठवण्यासाठी रोज रेल्वेच्या किमान तीन रॅकची आवश्‍यकता भासते; पण मागणी नोंदवूनही रेल्वेकडून रॅक मिळत नसल्याने व्यापाऱ्यांच्या गुदामातील कांदा बाहेर पाठवता येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही, ही व्यथा कांद्याचे व्यापारी सोहनलाल भंडारी यांनी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे मांडली होती. पटेल हे जिल्ह्यातील शेतकरी-निर्यातदारांचे प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह औरंगाबादला गेले. तेथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली अन्‌ रेल्वेचे रॅक स्थानकांवर दाखल झाले. 

Web Title: Onion prices increased by an average of Rs 200 per quintal