कांद्याला किलोला पन्नास पैसे भाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

पिंपळगाव बसवंत - पिंपळगाव बाजार समितीत सोमवारी कांद्याला अक्षरशः पन्नास पैसे प्रतिकिलो असा भाव पुकारला गेला. उत्पादन खर्चही न फिटणारा व डोळ्यांत पाणी आणणारा हा भाव मिळाल्याने तीन शेतकऱ्यांनी महामार्गावर कांदा फेकून देत सरकारच्या शेतमालविरोधी धोरणाच्या विरोधात संताप व्यक्त केला. उन्हाळ कांद्याची सध्या पिंपळगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. बाजारभाव सरासरी साडेसहाशे रुपये प्रतिक्विंटलने पुकारले जात आहेत. खर्च फिटेल या उद्देशाने शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विक्री करीत आहेत.
Web Title: Onion rate 50 paise kilo