कांदा ३०० ते ४५० रुपयांनी गडगडला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

शेतकऱ्यांनी आवक नियंत्रणात ठेवल्याने क्विंटलला साडेतीन हजार रुपयांच्या आसपास सरासरी भाव राहील, अशी शक्‍यता तयार झालेली असताना २४ तासांत कांद्याचे भाव क्विंटलला ३०० ते ४५० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाला राजकारण्यांना तोंड द्यावे लागणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

नाशिक - शेतकऱ्यांनी आवक नियंत्रणात ठेवल्याने क्विंटलला साडेतीन हजार रुपयांच्या आसपास सरासरी भाव राहील, अशी शक्‍यता तयार झालेली असताना २४ तासांत कांद्याचे भाव क्विंटलला ३०० ते ४५० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाला राजकारण्यांना तोंड द्यावे लागणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

शेतीमालाच्या भावाची गंभीर परिस्थिती तयार झालेल्या भागातून शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी दणकून यश मिळवले. त्यामुळे कांदा उत्पादकांचे दुखणे आताची निवडणूक कोणत्या टप्प्यावर नेणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कांद्याच्या विषयावर भूमिका मांडत हा विषय विरोधक लावून धरणार हे स्पष्ट केले होते. त्यामुळे विरोधकांना कांद्याचा विषय सत्ताधाऱ्यांनी आयता हातात दिल्याची स्थिती तयार झाली आहे. कांद्याच्या या वेळच्या दुखण्याचे दुहेरी अस्त्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तयार झाले आहे. शेतकरी नाराज आहेत. त्याच वेळी साठवणूक निर्बंधामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी न मांडता बघ्याची भूमिका स्वीकारली आहे.
चांदवड बाजार समितीमधील क्विंटलभर कांद्याचे भाव तीन हजार शंभर रुपयांपर्यंत घसरलेले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion rate Collapse