नाशिकचा कांदा पुन्हा एकदा घसरला; उत्पादक चिंतेत!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

कांदाच्या भावात तुलनात्मक घसरण होत असल्याने उत्पादक चिंतेत आहेत. तर कांदा दरवाढीबाबत धाेरणांचा विचार करुन हे दर नियंत्रणात आणण्याची मागणी खासदार भारती पवार यांनी  ग्रामीण विकास कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे केली आहे.

नाशिक : कांदाच्या भावात तुलनात्मक घसरण होत असल्याने उत्पादक चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे. तर कांदा दरवाढीबाबत धाेरणांचा विचार करुन हे दर नियंत्रणात आणण्याची मागणी खासदार भारती पवार यांनी  ग्रामीण विकास कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे  केली आहे.

- सटाण्यात मानधन वाढीसाठी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून 'आशा'ची मुक निदर्शने

कांदा आयात करण्यासाठीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील उत्पादक चिंतीत आहेत. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने निर्यातमुल्य 850 डॉलर्स मेट्रीक टन स्थिर केला आहे. केंद्र शासनाच्या एम एम टि सी या व्यापार कंपनीने दोन हजार टन कांदा आयातीची निविदा प्रसिध्द केली आहे. हा निर्णय उत्पादकांना मारक असल्याने निर्यातमुल्य हे शून्य करुन आयात निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

महिनाभरात होणार कांद्याची आवक

येत्या महिनाभरात महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव व औरंगाबाद तसेच लासलगाव बाजारपेठेत  कांद्याची आवक  80 ते 90 टक्के आवक होणार आहे. याचा विचार करुन नमुद रद्द् करण्याची मागणी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion rates decresed in nashik