कांदा उत्पादकांना दिवसाला 6 कोटींचा दणका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नाशिक : लाल कांद्याच्या उत्पादनासाठी क्विंटलला 900 रुपयांचा खर्च येत असल्याने केंद्राच्या धोरणानुसार किमान 1 हजार 350 रुपये दर शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. प्रत्यक्षात एक हजार सोडाच; पण शेतकऱ्यांना 650 रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. आवक वाढलेली असतानाच निर्यातीचा वेग मंदावल्याने घसरलेल्या दरामुळे दिवसभरात आवक होणाऱ्या दीड लाख क्विंटलमागे शेतकऱ्यांना 6 कोटींचा दणका बसू लागला आहे.

कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या रोषाचा बांध फुटला असून, आज उमराणे भागात मुंबई - आग्रा महामार्गावर आंदोलन करण्यात आले. त्यातच, निर्यातीत आणखी घसरण होण्याची भीती बळावल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कांदा विशेषतः सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह शिवसेनेच्या नेत्यांच्या डोळ्यांतून पाणी काढणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पणन विभागाच्या अंदाजानुसार हेक्‍टरी 11.6 मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, हवामान चांगले व पाण्याच्या उपलब्धतेमुळे उत्पादनात दीडपटीने वाढ झाली आहे. लाल कांदा मोठा होईल तसे काढणी करून पुन्हा पाणी देत पुढची काढणी करायची, अशी पद्धत 

गेल्यावर्षीपर्यंत राहिली. आता मात्र कांद्याची वाढ चांगली होत असल्याने एकदम कांद्याची काढणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे. 

Web Title: Onion rates down; Export may be affected