कांद्याची हजारी पार तरीही चाळीत साठवणुकीलाच पसंती!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मे 2019

साठवायला प्रयोग...
कांदा साठवायचा आहे पण चाळ नाही किंवा आहे तर क्षमता कमी..या अडचणी असूनही शेतकरी बंद पोल्ट्रीत,शेताच्या बांधावर झाडाखाली,जुन्या गोठ्यात,तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या कुडाच्या चाळीत कांदे साठवत आहेत.तसेच तारीचे मोठे गोलाकार साठवण करून त्यातही कांदे साठवले जात आहेत. जशी भावात सुधारणा होईल तशी विक्री करण्याचा मानस शेतकर्यांचा आहे.

येवला : गेले आठ-दहा महिने घसरलेल्या कांद्याच्या दरात काहीशी वाढ होऊन हजाराचा टप्पा पार झाला आहे. मात्र आता दर वाढून हजारी पार केली आहे.मात्र यात पुढील काळात दरात मोठी वाढ होईल या हेतूने शेतकरी आता दर वाढूनही उन्हाळ कांदा विक्री पेक्षा चाळीस साठवणुकीलाच प्राधान्य देत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे निवडणुकांचा माहोल असल्याने भाव तेजीत राहतील असा ही सट्टा शेतकरी लावत आहेत.

शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू असतांना समाधानकारक दर नव्हते.मात्र मागील आठवड्यात थोडी-थोडी वाढ होतांना दिसत आहेत.मात्र मागील वर्षी कांद्याची माती झाली आता तरी दोन रुपये मिळतील या आशेवर चाळीत साठवणूक करण्याला शेतकरी प्राधान्य देत आहेत.गेले वर्षभर कांद्याला मिळालेला अल्पसा भाव दुर्लक्षून शेतकऱ्यांनी प्रतिकूल स्थितीतही कांद्याचे उत्पादन घेतले आहे. यावर्षी महाराष्ट्र,उत्तर प्रदेश,बिहार,राजस्थान,पश्चिम बंगाल,मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश आदी राज्यात कांद्याचे उत्पादन घेतले गेल्याने साहजिकच आपल्याकडील कांद्याला मागणी कमी असल्याने त्याचा परिणाम भावावर झाला आहे. 

इतके दिवस सरासरी ५०० ते ६५० रुपयेच असलेल्या भावात काहीशी सुधारणा होऊ लागली असून येथील बाजार समितीत आज १०० ते १००२ तर सरासरी ७५० पर्यत भाव मिळाला.यामुळे आवकही वाढली व दिवसभरात १२ हजार क़्विटला कांदा खरेदी झाला आहे. हा भाव उत्पन्न खर्चाच्या तुलनेत कमीच असल्याने दुय्यम प्रतींचा कांदाच सध्या विक्री केला जात असून प्रतवारी करून उत्तमदर्जाचा बाजूला काढलेले कांदे मात्र प्रत्येक जन साठवनुक करून ठेवत आहेत.

साठवायला प्रयोग...
कांदा साठवायचा आहे पण चाळ नाही किंवा आहे तर क्षमता कमी..या अडचणी असूनही शेतकरी बंद पोल्ट्रीत,शेताच्या बांधावर झाडाखाली,जुन्या गोठ्यात,तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या कुडाच्या चाळीत कांदे साठवत आहेत.तसेच तारीचे मोठे गोलाकार साठवण करून त्यातही कांदे साठवले जात आहेत. जशी भावात सुधारणा होईल तशी विक्री करण्याचा मानस शेतकर्यांचा आहे.

“मागील वर्षी उन्हाळ कांदा विकून खर्च सुद्धा फिटला नव्हता.मात्र भाववाढीच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी यंदाही अधिक क्षेत्रावर उन्हाळ कांदा पीक घेतलेय. यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांद्याला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने चाळीत साठवणूक करून ठेवत आहे.”
- वाल्मिक सोनवणे,शेतकरी,धुळगाव

"मागील वर्षी लाल कांदाला भाव नसल्याने व त्यानंतर पावसाअभावी मकाचे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत.आज उन्हाळ कांद्याला भाव नसून देखील लग्न,कौटूंबिक गरजांसाठी कमी दराने कांदा विकावा लागतोय तर अनेक जण गरजेपुरता विकून बाकीचा चाळीत साठवत आहेत."
- बाळासाहेब मढवई,शेतकरी,चिचोंडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion storage in Nashik