नाशिक - कसमादेत कांदा चाळी उभारणीच्या कामांना वेग

रोशन भामरे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : कसमादे परिसरात गतवर्षीच्या कांद्याला चांगला भाव मिळाल्याने चालू वर्षी कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. चालू वर्षी थंडीही जास्त प्रमाणात होती मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकास पोषक व अनुकूल हवामान मिळाले नाही. त्यामुळे यंदा कांदा उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी होणार असली तरी जेवढा पण कांदा निघेल तेवढा साठून ठेवण्यासाठी परिसरात कांदा चाळी बनवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरु आहे.

तळवाडे दिगर (नाशिक) : कसमादे परिसरात गतवर्षीच्या कांद्याला चांगला भाव मिळाल्याने चालू वर्षी कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. चालू वर्षी थंडीही जास्त प्रमाणात होती मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकास पोषक व अनुकूल हवामान मिळाले नाही. त्यामुळे यंदा कांदा उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी होणार असली तरी जेवढा पण कांदा निघेल तेवढा साठून ठेवण्यासाठी परिसरात कांदा चाळी बनवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरु आहे. सद्यस्थिती बघता कांद्याला कवडीमोल बाजारभाव असल्यामुळे जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवण्याचा निर्णय घेतला असून आज कवडीमोल भावाने जाणाऱ्या  कांद्याला भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल या आशेवर कांद्याची साठवणूक करून ठेवण्याकरीता कसमादेतील शेतकरी कांदा चाळी उभारणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

परिसरात मागील काही वर्षात कांदा चाळी उभारल्या,परंतु यंदा मात्र मागील दहा-पंधरा वर्षाच्या तुलनेत जानेवारी ते एप्रिल  महिन्यात सर्वात जास्त कांदा चाळीची उभारणी झाली आहे,तर काही ठिकाणी कांदा चाळी उभारणीची कामे जोरात सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.नाशिक जिल्ह्यातील कळवण,सटाण,देवळा,मालेगाव या तालुक्यात सर्वात जास्त कांद्याचे पिक घेतले जाते व लाखो टन कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

रब्बी हंगामातील कांदा हा साठवणुकीयोग्य असल्यामुळे तो साठवण्यासाठी पूर्वीच्या काळी शेतकरी शेतात ऊसाच्या पाचटाच्या चाळी बनवत होता पण सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे परिसरात ऊस लागवडीत लक्षणीय घट झाल्यामुळे ऊसाचे पाचट उपलब्ध होत नाही आणि दरवर्षी त्यांची दुरस्ती त्यामुळे पाचताच्या चाळी जवळ जवळ नामशेष झाल्या असून त्याची जागा आता पत्र्याच्या चाळीने घेतली असून त्या बनवण्याच्या कामात परिसरातील शेतकरी व्यस्त आहे. 

सध्या रब्बी हंगामातील कांद्याची काढणी सुरु असून .हा रब्बी हंगामातील कांदा साठवण्यायोग्य असतो.कसमादेतील कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी ७५ ते ८० टक्के कांदा हा रब्बी हंगामात म्हणजे मार्च ते एप्रिल संपे पर्यंत संपत असतो व तो कांदा साठवण्यासाठी योग्य असल्याने तो जास्त काळ टिकून राहावा यासाठी सध्या सर्वत्र कांदा चाली उभारण्याच्या कामांना गती मिळाली आहे.

कांद्याची दीर्घकाळ साठवणूक करावयाची असेल तर तापमान आणि आद्रता या बाबीचा विचार करणे गरजेचे आहे.कांदा चाळ उभारताना चाळीची क्षमता, जागेची निवड,बाधकाम साहीत्य,चाळीची दिशा,पत्रे आणिवायुविजन या महत्वाच्या बाबी आहेत,तसेच अतिरासायनिक खताचा वापर केलेल्या क्षेत्रातील कांदा जास्त काळ टिकत नाही.कांद्यासाठी कमीतकमी रासायनिक खतांचा वापर करावा.कांदा पिकात नत्राचा वापर कमी करावा अशाच कांद्याची साठवण कांदा चाळीत केल्याने तो कांदा दीर्घकाळ टिकू शकतो.राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदाचाळी उभारणीसाठी अनुदानाची सोय असते,याचा देखील लाभ घेऊन शेतकरी चाळी उभारत आहे.

Web Title: onion storage work of starts in nashik