ऑनलाइन बिलासाठी इ-मेल, मोबाइल क्रमांक नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

‘महावितरण’तर्फे आवाहन; ६५ हजार ग्राहक घेताहेत माहिती

जळगाव - वीजबिलांची ऑनलाइन माहिती किंवा वीज बंद असल्याच्या कालावधीची माहिती ग्राहकांना एसएमएस व ईमेलद्वारे देण्याचे ‘महावितरण’कडून जाहीर करण्यात आले आहे. याकरिता वीजग्राहकांनी ‘महावितरण’च्या टोल फ्री क्रमांकावर मोबाइल क्रमांक व इ-मेल आयडीची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘महावितरण’ने आपला कारभार आणि ग्राहक सेवाही ऑनलाइन करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार ऑनलाइन बिलिंग, बिल भरणा, मोबाइल ॲपवरूनच ग्राहकाने मीटररीडिंग घेऊन ‘महावितरण’कडे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘महावितरण’ने कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या ‘कर्मचारी मित्र’ या मोबाइल ॲपद्वारे वीजपुरवठा बंद असलेल्या वीजवाहिनीची नोंद घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित वीजवाहिनीवरील ग्राहकांच्या मोबाइलवर ‘वीज बंद’बाबतच्या कालावधीची माहिती ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येणार आहे. दर महिन्याला मिळणाऱ्या बिलाची माहिती ‘एसएमएस’द्वारे किंवा इ-मेलवर उपलब्ध होण्यासाठी ग्राहकांकडून संबंधित माहिती मागविण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव परिमंडळातील सुमारे ६४ हजार ६९२ ग्राहकांनी मोबाइल क्रमांक, तर १५ हजार २०० ग्राहकांनी इ-मेल आयडीची नोंदणी केली आहे.

या क्रमांकावर करता येणार नोंदणी

‘महावितरण’कडून ग्राहकांना मोबाइल क्रमांक किंवा इ-मेल आयडीची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात ‘महावितरण’च्या ९२२-५५९-२२५५ या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे ग्राहकांना इ-मेल आयडी व मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. ग्राहकांनी मोबाइल क्रमांकावर बाराअंकी ग्राहक क्रमांक, इ-मेल अशी माहिती टाइप करून ‘एसएमएस’ केल्यास आयडीची नोंदणी होईल. तसेच नोंदणी करावयाच्या मोबाइल क्रमांकावरून ‘महावितरण’च्या टोल फ्री क्रमांकावर (MREG व बाराअंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून ‘एसएमएस’ केल्यानंतर मोबाइल क्रमांकाची नोंदणी होणार आहे.

Web Title: Online bill for e-mail, mobile registration number

टॅग्स