ऑनलाइन पेमेंटमुळे एटीएमवरचा भार हलका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नाशिक - दोन-चार दिवसांच्या शासकीय सुटींमुळे बॅंकेचे व्यवहार ठप्प होऊन ग्राहकांची कोंडी व्हायची. त्यावर एटीएमचा पर्याय आला. मात्र त्यातही जास्त दिवसांची सुटी असल्यास चलनाअभावी खडखडाट होऊन ग्राहक निराश होत.

गेल्या आठवडाभरात तीन दिवस बॅंका बंद असतानाही एटीएम बाहेर रांगा नाहीत की, एटीएमचा खडखडाटही दिसून आलेला नाही. ऑनलाइन पेमेंटचे एकापेक्षाही अधिक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांना मोठा दिलासाच मिळाला आहे. तसेच, यामुळे एटीएमवरील खूप मोठा भारही हलका झाला आहे. 
गेल्या शुक्रवारपासून रविवारपर्यंत राष्ट्रीयकृत बॅंकांसह खासगी बॅंका बंद होत्या.

सोमवारी बॅंका नियमित सुरू झाल्या आणि पुन्हा आजपासून (ता.२५) दोन दिवस बॅंका बंद आहेत. त्यामुळे आठवडाभरामध्ये ५ दिवस बॅंका बंद राहणार असल्या तरी त्याचा परिणाम ग्राहकांवर दिसून आलेला नाही. तीन दिवसांच्या कालावधीमध्ये कुठेही एटीएममधील पैसे संपल्याने ग्राहकांना रांगा लावाव्या लागल्याचे चित्र दिसले नाही. ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंटचे पर्याय स्वीकारलेले आहेत. एरवी पैशांसाठी एटीएमबाहेर रांगा दिसत, त्या आता दिसतच नाहीत.

ग्राहक आता बॅंकाकडे क्वचित वळतात. कागदोपत्रांची पूर्तता, डिपॉझिट याकामांसाठी बॅंकात ग्राहक जातात, तर काही प्रमाणात रोकड असावी, यासाठी एटीएमचा वापर केला जातो.

ऑनलाइन सेवेतून परतावा
अनेक ऑनलाइन पर्याय आर्थिक व्यवहार करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. ग्राहकही आता ऑनलाइन पेमेंट सर्व्हिसला पसंती देताना दिसतात. या ऑनलाइन सेवेचा लाभ घेण्यात आजची तरुणाई आघाडीवर असली तरी ज्यांनी बॅंक आणि एटीएमच्या रांगाही अनुभवल्या आहेत, असे ग्राहकदेखील या ऑनलाइन पेमेंट सर्व्हिसच्या प्रेमात पडले आहेत.

Web Title: Online Payment ATM

टॅग्स