उच्च शिक्षणातील प्राध्यापकांना ऑनलाइन प्रशिक्षण सक्तीचे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नाशिक - उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांना ऑनलाइन प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. "स्वयम'च्या माध्यमातून 15 लाख प्राध्यापकांच्या उजळणी प्रशिक्षणासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 75 राष्ट्रीय केंद्रे अधिसूचित केली आहेत. त्यात पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबादमधील 9 शैक्षणिक संस्थांच्या केंद्रांचा समावेश आहे. हवामान बदल, ऊर्जा व्यवस्था अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन, कौशल्य विकास या विषयांचे अभ्यासक्रम असतील. 

केंद्रांमध्ये ऑनलाइन प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला जाईल. त्यात प्रत्येक विषयाची अद्ययावत माहिती, नवे आणि येऊ शकणारे विषय, शैक्षणिक सुधारणा आणि सुधारित अभ्यासक्रम शिकवण्यासाठीच्या पद्धती या सगळ्यांचा विचार करणे अपेक्षित आहे. विषय आणि ज्येष्ठते पलीकडे प्राध्यापकांना नवे तंत्रज्ञान आणि शिकविण्याच्या आधुनिक पद्धतीचे ज्ञान या अभ्यासक्रमातून मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात निवड केलेल्या 75 संस्थांमध्ये पंडित मदनमोहन मालवीय राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण अभियानांतर्गतचे केंद्रीय विद्यापीठ, आयुका, आय.आय.एस., आय.आय.टी., आय.आय.एस.ई.आर., एन.आय.टी. अन्‌ राज्यातील विद्यापीठे आहेत. या संस्थांमधून चालवल्या जाणाऱ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांत समाजशास्त्र, विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, शिक्षण नियोजन आणि व्यवस्थापन, सार्वजनिक धोरण, नेतृत्व आणि प्रशासन, लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स आणि खगोल विज्ञान अशा अनेक विषयांचा समावेश आहे. 

Web Title: Online training is mandatory for higher education faculty