नऊ महिन्यांत अवघी 34 टक्के रक्कम खर्च 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची कारणे देत नगरसेवकांच्या विकासकामांना केराची टोपली दाखविणाऱ्या प्रशासनाचे बिंग आयुक्तांसमोर फुटले. महापालिकेने मंजूर केलेल्या एकूण अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार अवघी 34 टक्के रक्कम नऊ महिन्यांत खर्च झाल्याचे बघून आयुक्त राधाकृष्ण गमेदेखील अवाक्‌ झाले. त्यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक कशी म्हणता येईल?, असा सवाल करत प्रशासनाची कोंडी केली. 

जानेवारीत तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांची एक हजार 783 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. स्थायीने काही योजनांचा समावेश केल्याने सुमारे 116 कोटी रुपये वाढून 1899.74 कोटींपर्यंत अंदाजपत्रक पोचले. मार्चअखेरीस महासभेने अंदाजपत्रकाला मंजुरी देताना 2033 कोटींपर्यंत अंदाजपत्रक पोचविले. आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची फेब्रवारीत नियुक्ती झाली. त्रिसूत्रीचा अवलंब करत मुंढे यांनी अनेक कामांना कात्री लावली. नगरसेवक निधी नाकारण्याबरोबरच विकासकामांचे प्रस्तावदेखील धुडकावून लावले. कामेच होत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी वाढत असताना मुंढेंकडून कोट्यवधींचे प्रस्ताव महासभेवर दाखल होऊ लागले. नगरसेवकांच्या प्रस्तावांना नाकारणाऱ्या मुंढे यांनादेखील धडा शिकविण्याचा भाग म्हणून महासभा व स्थायी समितीत प्रस्तावांना विरोध होऊ लागला. महापालिकेतून मुंढे यांची बदली झाल्यानंतर मात्र प्रशासन- लोकप्रतिनिधी संघर्षात शहरविकास खुंटल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अवघे सहाशे कोटींचा खर्च 
नूतन आयुक्त गमे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या आढाव्यात एकूण 2033 कोटींचे अंदाजपत्रकाला मंजुरी असल्याचे सागण्यात आले; परंतु अंदाजित रकमेपैकी अवघे 34 टक्के म्हणजेच सुमारे सहाशे कोटी रुपये खर्च झाले. खर्ची रकमेपैकी बहुतांश रक्कम महसुली कामासाठी खर्च झाली. मोठ्या प्रमाणात अखर्चित रक्कम शिल्लक राहिल्याने महापालिकेचा स्पील ओव्हर कमी झाल्याची पाठ थोपटली जात असली, तरी विकासकामे ठप्प झाल्याची बाबदेखील अधोरेखित झाली आहे. 

Web Title: only 34 percent of the Amount spent in nine months