Nandurbar News : पीएम किसान योजनेसाठी पोस्टात खाते उघडा; प्रवर अधीक्षक सोनवणे यांचे आवाहन

PM Kisan Yojna
PM Kisan Yojnaesakal

नंदुरबार : भारतीय डाक विभागातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची, आयपीपीबीमार्फत आपल्या गावातील नजीकच्या पोस्ट कार्यालयात खाते उघडण्यात येत असल्याची माहिती धुळे विभागाचे डाकघर प्रवर अधीक्षक प्रताप सोनवणे यांनी दिली.

डाक विभागामार्फत ज्या नागरिकांचा आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल त्यांचेही आयपीपीबीच्या सीईएलसी यूझरमार्फत (जर आपल्या गावातील नजीकच्या पोस्ट कार्यालयात सीईएलसी यूझर असेल तर त्यांच्या मार्फत) आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येईल. (Open Account in Post for PM Kisan Yojana Superintendent Sonawane appeal Nandurbar News)

हेही वाचा :'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

PM Kisan Yojna
Jalgaon News : कौटुंबीक न्यायालयाच्या अधीक्षकाला लाच घेताना अटक

तसेच आयपीपीबीमार्फत पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासोबतच आयपीपीबी खातेधारकास रुपये ३९६, तसेच ३९९ रुपयांत अपघाती विम्याचे दहा लाखांचे संरक्षणसुद्धा घेऊ शकतील.

यासोबतच खातेधारक आयपीपीबीचे मोबाईलवर ॲप डाउनलोड करून वीजबिल, मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, पोस्ट ऑफिसच्या बचतखाते, आरडी, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना खाते, ग्रामीण डाक जीवनविमा इत्यादींचे हप्ते घरबसल्या जमा करू शकतात, तसेच खात्यातील रक्कम दुसऱ्या बँक खात्यात हस्तांतर करू शकता येईल.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या गावातील नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये आधारकार्ड लिंक करून आयपीपीबीची खाती उघडावीत, असे आवाहन श्री. सोनवणे यांनी केले आहे.

PM Kisan Yojna
Jalgaon News : पैशांसाठी विवाहितेला मारहाण व छळ; पोलिसांन कडून गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com