नाशिककरांना गृहखरेदीची संधी 

नाशिककरांना गृहखरेदीची संधी 

नाशिक - नाशिकमध्ये स्वप्नातील गृहखरेदीची संधी क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्‍सपोच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, 21 ते 23 डिसेंबरपासून गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहावर प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शनात नामवंत प्रकल्पाची माहिती, फ्लॅट, प्लॉट, फार्महाऊस, शेतजमीन, बांधकाम साहित्य, गृहकर्ज एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे, अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे व प्रदर्शनाचे समन्वयक अनिल आहेर यांनी दिली. 

क्रेडाई देशातील बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था असून, अकरा हजारांहून अधिक बांधकाम व्यावसायिक संस्थांसोबत आहेत. क्रेडाईच्या माध्यमातून नाशिककरांना गृहखरेदीची संधी उपलब्ध करून दिली जाते. या वर्षीही प्रॉपर्टी एक्‍सपो आयोजित केला आहे. यंदाच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट म्हणजे नाशिकमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे श्री. वानखेडे यांनी सांगितले. गणेशोत्सव, दसरा व दिवाळीत गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने गृहखरेदी झाली. प्रॉपर्टी एक्‍सपोच्या माध्यमातून गृहखरेदीचा शेवटचा मुहूर्त असल्याने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रदर्शनात अर्थपुरवठा करणाऱ्या नामांकित वित्तीय संस्था, बांधकाम साहित्यातील नामांकित कंपन्या, फूड, अपारंपरिक ऊर्जा, सेवा पुरविणाऱ्या विविध संस्था आदींचा सहभाग राहणार आहे. प्रदर्शनात शंभरहून अधिक बांधकाम व्यावसायिक, 15 पेक्षा जास्त गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था व अन्य बांधकाम साहित्य कंपन्यांचे स्टॉल्स असतील. प्रदर्शनानिमित्त बुकिंग करणाऱ्या तीन भाग्यवंतांना हॅचिको किचन ट्रॉलीतर्फे गिफ्ट व्हाउचर जिंकण्याची संधी आहे. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष रवी महाजन, सहसमन्वयक ऋषिकेश कोते, माजी अध्यक्ष सुनील कोतवाल, कृणाल पाटील, अतुल शिंदे, राजेश पिंगळे, नरेंद्र कुलकर्णी, राजेश आहेर प्रयत्नशील आहेत. 

प्रॉपर्टी एक्‍सपोचे वैशिष्ट 
- 2000 चौरस फूट आकारात डोम 
- शंभर विकासकांचा समावेश 
- अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांचा सहभाग 
- दहा हजार सदनिका उपलब्ध 
- तीनशे गृहप्रकल्पांचा समावेश 
- 15 लाख ते दोन कोटींपर्यंत किमतीच्या सदनिका 
- महारेरा रजिस्टर प्रकल्प 

आरोग्यसेवा, शैक्षणिक संस्थांचे जाळे, आल्हाददायक वातावरण व नियमित सुरू झालेल्या विमान सेवेमुळे आगामी काळात नाशिकमध्ये चांगली गुंतवणूक होण्याची शक्‍यता आहे. 
- उमेश वानखेडे, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो 

प्रॉपर्टी एक्‍सपोच्या माध्यमातून नाशिककरांसह राज्यातील अन्य भागातील नागरिकांना नाशिकमध्ये गृहखरेदीची चांगली संधी उपलब्ध होणार आहे. 
- अनिल आहेर, समन्वयक, प्रॉपर्टी एक्‍सपो 

राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये दर स्थिर असल्याने ग्राहकांना प्रदर्शनाचा लाभ होईल. 
- रवी महाजन, उपाध्यक्ष, क्रेडाई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com