मुंडेंच्या नावाने पवारांकडून शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

ताई करा सही...
येथील कार्यक्रमात आ. जितेंद्र आव्हाड यांनी पंकजाताईंकडे गेलो की कागदावर सही होऊन कोटी, दीड कोटी हक्काने मिळतात, असे सांगितले. त्यावर पंकजाताईंशेजारी बसलेल्या शरद पवारांनी लागलीच सहीसाठी रायटिंग पॅड पुढे केल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

नाशिक -  राजकारणात एकमेकांना असलेला विरोध फक्त निवडणुकीपुरता मर्यादित असतो. एकदा निवडणूक झाली, की विधायक कामांसाठी विरोध बाजूला सारून काम करायचे असते. या प्रगल्भ राजकारणाचा अनुभव आज नाशिककरांना पाहायला मिळाला.

राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना कायम विरोधाची भूमिका घेणारे (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने दस्तुरखुद्द श्री. पवार यांनीच पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली, तर क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या नावानेदेखील २५ लाख, अशी एकूण ५० लाख रुपयांची देणगी व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेला देण्याचे जाहीर केले.  येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्‌घाटन सोहळा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. श्री. पवार हे नाईक संस्थेच्या कार्यक्रमाला जात असल्याचे समजताच खा. सुप्रिया सुळे यांनी संस्थेला पाठिंबा देण्याची भूमिका व्यक्त केली. त्यानुसार पवार पब्लिक ट्रस्टतर्फे ५० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीची घोषणा करत असल्याचे पवार यांनी घोषित केले. यापैकी २५ लाखांची शिष्यवृत्ती लोकनेते मुंडे यांच्या नावाने, तर २५ लाखांची शिष्यवृत्ती क्रांतिवीर नाईक यांच्या नावाने दोन विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

ताई करा सही...
येथील कार्यक्रमात आ. जितेंद्र आव्हाड यांनी पंकजाताईंकडे गेलो की कागदावर सही होऊन कोटी, दीड कोटी हक्काने मिळतात, असे सांगितले. त्यावर पंकजाताईंशेजारी बसलेल्या शरद पवारांनी लागलीच सहीसाठी रायटिंग पॅड पुढे केल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Web Title: The opposition to each other in politics is limited to elections only