वादळी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

धनराज पाटील
बुधवार, 12 जून 2019

पाचोरा येथे अवकाळी पावसाने मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने आज सकाळीच आठ वाजता पाचोरा प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली.

पाचोरा : पिचर्डे, बात्सर, पाढंरद या परिसरात प्रांत अधिकारीसह तहसिलदार, कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले.

पिचर्डेसह परिसरात अवकाळी पावसाने मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने आज सकाळीच आठ वाजता पाचोरा प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. लगेच तलाठी, कृषीसहाय्यक, ग्रामसेवक यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी भडगाव तहसिलदार गणेश मरकड, तालुका कृषी अधिकारी गोर्डे सर्व कुषी विभागाचे कर्मचारी तसेच महसुल विभागाचे सर्व कर्मचारी सोबत होते. तसेच भडगाव पंचायत समिती सभापती रामकुष्ण पाटील, बात्सरचे संजय पाटील यांच्यासह पिचर्डे, बात्सर येथील संरपच, उपसंरपच, ग्रामस्थ, शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच ज्या गावातील घरांचे नुकसान झाले आहे त्या गावातील घरांचे ग्रामसेवक यांनी लगेच गावातील घरांचे पंचनामे करण्यात सुरवात केली आहे.

पिचर्डे येथील जिजामाता विद्यालयाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते; शाळेची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. तसेच शेतात जाऊन तलाठीसह कर्मचारी पंचनामा करण्यात सुरवात केली आहे.

 

pachora


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order for cheking for windfall damages at pachora jalgaon