एकुलता पुत्र गमावल्यावरही पाच जणांना नवजीवन

संपत देवगिरे
सोमवार, 26 डिसेंबर 2016

त्र्यंबकेश्‍वर जवळच्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शिवम वाकचौरे (वय 19) याचा रविवारी (ता.25) त्र्यंबक रोडवर दुचाकीच्या अपघातात डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारसाठी सिक्‍स सीग्मा रुग्णालयात दाखल केले असता तो "ब्रेनडेड' झाल्याचे निष्पन्न झाले.

नाशिक - दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवम प्रदिप वाकचौरे या एकुलत्या मुलाला प्राण गमवावा लागला. मात्र गंभीर आजारी असलेल्या पित्याच्या सह्रदयतेने अवयवदानाचा निर्णय घेतला अन्‌ पाच जणांना नवजीवन मिळाले. आज पुणे, नाशिकला या सर्व शस्त्रक्रीया यशस्वी झाल्याने सगळ्यांनीच समाधानाचा श्‍वास घेतला. 

त्र्यंबकेश्‍वर जवळच्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शिवम वाकचौरे (वय 19) याचा रविवारी (ता.25) त्र्यंबक रोडवर दुचाकीच्या अपघातात डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारसाठी सिक्‍स सीग्मा रुग्णालयात दाखल केले असता तो "ब्रेनडेड' झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी डॉक्‍टरांनी पालकांना परिस्थिती स्पष्ट करुन अवयवदानाचा प्रस्ताव मांडला.

तेव्हा स्वतः गंभीर आजारी असल्याने उपचार घेत असलेले शिवमचे वडील प्रदिप वाकचौरे, बहिन रिया यांनी कुुटंबातील एकुलता मुलगा गमावल्याचे दुःख बाजुला सारुन त्याला होकार दिला. त्यानंतर ऋषिकेश हॉस्पीटलचे डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. अनिरुध्द ढोकरे, डॉ. श्‍याम पगार, डॉ. संजय रकिबे, डॉ. प्रणव छाजेड यांनी तातडीने कार्यवाही करीत त्याचे लिव्हर पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयास, दोन डोळे नाशिकच्या डॉ. प्राची पवार यांच्या मणीशंकर आय हॉस्पीटलच्या दोन रुग्णांना देण्यात आले. ऋषीकेश रुग्णालयात दोन रुग्णांना कीडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले. अवयव दान केलेल्या कुुटंबीयांसह सिक्‍स सीग्मा हॉस्पीटलचे डॉ. स्वप्नील पारख, डॉ. विशाखा जहागीरदार, डॉ. अहिरराव यांचा सत्कार करण्यात आला.
 

Web Title: organ donation in nashik