भर दुष्काळातही राजापूरला फुलली एक लाख रोपांची रोपवाटिका

crops
crops

येवला - जेथे प्यायला टँकरने पाणी पुरवठा सुरु होता अश्या राजापूरच्या जंगलात वनविभागाने वडपाटी पाझर तलावालगत मग्रारोहयो अंतर्गत एक लाख रोपांची रोपवाटीका तयार केली आहे. २० गुंठयांच्या क्षेत्रातील या रोपवाटिकेतील रोपे शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड या उपक्रमातून पावसाचे आगमन होताच कातरणी, 
विसापूर, भुलेगाव भागातील जंगलात लागवड होणार असल्याने तालुक्याचा मोठा भाग हिरवागार होऊन वनसंवर्धन होणार आहे.   

राजापूर ममदापुर परिसर म्हणजे नेहमीच दुष्काळी परिस्थिती असलेला भाग असून कितीही पाऊस झाला तरी मार्च-एप्रिल महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.वन्यजीव देखील टंचाईच्या या दाहकतेत भाजून निघतात.यावर्शी तर या भागात थेंबभर पाणी नसल्याचे चित्र होते.मात्र या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वनविभागाने ममदापुर संवर्धन राखीव मध्ये वडपाटी बंधारा परिसरात वनराई हिरवीगार करण्याचा हा आगळा वेगळा प्रकल्प हाती घेतला आहे.दोन वर्षापूर्वी आमदार नरेद्र दराडे यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून हा बंधारा २८ वर्षानंतर दुरुस्त झाला आहे.त्यामुळे भर उन्हाळ्यात पाणी राहिल्याने वनविभागाला रोपवाटिका फुलवणे शक्य झाले आहे.  

जंगल वाढीसाठी, हिरवाई फुलवण्यासाठी वन विभागाने राजापूर वन हद्दीत वडपाटी पाझर तलावाजवळ नर्सरी बनविलेली आहे. तिथे बंधार्‍यातुन सौर ऊर्जा वर चालणारा विद्युत पंप बसवून त्याच्या सह्याने बंधार्यामधील पाणी शेजारच्या सपाट जागेवर घेऊन त्या ठिकाणी मजुरांच्या सह्याने एक लाख पिशवीत माती भरून चिंच, शिसव, बांबू, करंज, शिवण, सिताफळ, पापडी एवढ्या प्रजातीची रोपे लावलेली आहे. मागील वर्षी जुलै मध्ये सुरु झालेले रोपे तयार करण्याची हि मोहीम नऊ महिन्यांचा कालावधी नंतर यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. आजमितीस हि सर्व रोपे लागवडी योग्य झाली आहे. रोजगार हमी योजना अंतर्गत हे काम केल्याने स्थानिकांना रोजगार मिळत रोपवाटिकेत एक लाख रोपे तयार केलेली आहे.

“राजापुर येथील वडपाटी येथे मग्रारोहयो अंतर्गत जुलै पासुन एक लाख रोपांची रोपवाटीका तयार केली आहे. या २०  गुंठ्यामध्ये विविध प्रजातीची रोपे तयार केली असून १३ कोटी वृक्ष लागवड हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा प्रकल्पात त्यांची लागवड केली जाईल. पाणीटंचाई असतांना सुयोग्य नियोजनाने भर उन्हाळ्यात ही रोपे प्रयत्नपूर्वक तयार केली आहे.आता पावसाचे आगमन होताच लागवड केली जाणार आहे.”
 संजय भंडारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com