पंच्च्याहत्तरीतही निवृत्त प्राचार्यांचे विनामूल्य ज्ञानदान

PA Dhangar
PA Dhangar

भडगाव : नौकरदार सेवानिवृत्त झाल्यावर एकदाचा सुटलो कटकटीतुन म्हणुन सुटकेचा निस्वा:स टाकत असतात. मात्र भडगावातील सेवानिवृत्त प्राचार्य हे पंच्च्याहत्तरीतही ज्या किसान शिक्षण संस्थेत 34 वर्ष सेवा केली. त्या संस्थेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत 9 वर्षापासुन अविरित पणे सेवा देत आहे. तेही विनामुल्य हे विशेष!

येथील पी. ए. धनगर हे 1969 ला किसान शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीला लागले. ते काही दिवसातच प्रचार्य ही झाले. त्यांना संस्थेत एकुन 34 वर्षाच्या सेवेत तब्बल 27 वर्ष प्राचार्याची संधी मिळाली. ते 2002 मध्ये आमडदे येथील माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयाच्या प्राचार्यापदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते मुलगा वैद्यकीय व्यवसायानिमित्त नाशिकाला असल्याने ते मुलासोबत रहायला गेले. पण त्यांना अंगातील शिक्षकी पेशा स्वस्थ बसू देत नव्हता. तेथे ते एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्राचार्य म्हणून रूजु झाले. पण त्यांनी संस्थेकडुन एक रूपयाही मानधन घेतले नाही. अशातच 2008 मधे कीसान शिक्षण संस्थेने भडगावात इग्लिंश मीडीयम ची स्थापना केली. 

2009 ला किसान संस्थेने त्यांना इंग्लिश मीडीयममधे काम करण्याची विनंती केली. योग्य पगार ही देण्याचे मान्य केला. ते तत्काळ नाशिकहून् भडगावला आले. शाळेच्या प्रचार्य पदाचा पदभार घेतला. संस्थने त्यांना पगार देऊ केला पण त्यांनी नम्रपणे तो नाकारला. "पगार देत असाल तर मी शाळेत येणार नाही" असे सांगितले. ते सलग नऊ वर्षांपासून विनामुल्य सेवा बजावत आहे. सद्यस्थि:तीला भडगावातील सर्वांत मोठी इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून ही शाळा नावारूपाला आली आहे. इंग्लिश मीडीयम मध्ये एकुण 568 विद्यार्थी असुन आठवीपर्यत 22 तुकड्या आहेत. 

'ज्ञानदान' हीच खरी सेवा
सलग 34 वर्ष विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर ही ज्ञानदान अवरित पणे आपल्या हातुन घडावे अशी भावना मनात होती त्यामुळे आपण निवृत्ती नंतरही शिक्षण क्षेत्रात सक्रीय राहीलो असे पी.एम.धनगर यांनी सांगितले. मला एक मुलगा आहे. तो डाॅक्टर आहे. तर पेन्शन ही मिळते त्यामुळे पगाराची बिलकुल  आवश्यकता नाहि. कीसान संस्थेचे संस्थापक हरी रावजी पाटील यांनी माझ्यातील गुणवत्ता पाहून मला नोकरी दिली. 27 वर्ष प्राचार्याचि संधी दिली हेच माझ्यासाठी खुप झाले. त्यातुन उतराई होण्यासाठीच मी संस्थेत  सेवा बजावत आहे. संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील पाटील यांनी मला शाळा चालवितांना सर्वाधिकार दिले आहेत. शरीर जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत संस्थेत काम करू असे पी.एम.धनगर यांनी 'सकाळ' ला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com