निवडणूक काळात पाच ठिकाणी नाकाबंदी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

निवडणूक काळात पाच ठिकाणी नाकाबंदी 

निवडणूक काळात पाच ठिकाणी नाकाबंदी 

जळगाव,  निवडणूक काळात पैसे व दारू वाटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी शहराबाहेरून येणाऱ्या मुख्य पाच रस्त्यांवर पोलिस प्रशासन, महसूल, अबकारी विभागातर्फे नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच तीन भरारी पथकेही तयार केली जाणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. 
महापालिकेची एक ऑगस्टला निवडणूक असून, आचारसंहिताही लागू आहे. याबाबत आयुक्तांनी पोलिस प्रशासन, महसूल तसेच अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांची आज दुपारी बैठक घेतली. बैठकीत आयुक्तांनी आचारसंहितेबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. तसेच यावर उपयोजनांबाबत चर्चा झाली. बैठकीत शहराबाहेरून पैसा तसेच दारूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी शहराबाहेरून येणाऱ्या पाच मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच तीन भरारी पथके नेमली जाणार आहेत. प्रत्येक पथकासोबत व्हिडिओ चित्रीकरण करणारा देखील असेल. 

अन्यथा कारवाई... 
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यात उद्यापासून (4 जुलै) नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू होत आहे. त्यात शहरात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेरील फलक, होर्डिंग झाकले गेले नाही, याबाबत महापालिकेने पोलिस प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे. फलक व होर्डिंग झाकले न गेल्यास उद्यापासून गुन्हे दाखल होण्याची शक्‍यता आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Web Title: pach