सटाण्यात प्रहार शेतकरी संघटनेचे बेमुदत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

सटाणा - शहरात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृतपणे सुरु असलेला भाजीपाल लिलाव बाजार समितीमध्ये सुरु करावा तसेच दहा टक्के दराने होत असलेली आडत बंद करून शेतकऱ्यांची लुट थांबवावी, या मागणीसाठी काल शुक्रवार (ता.१५) रोजी बागलाण तहसील कार्यालयासमोर प्रहार शेतकरी संघटनेतर्फे बेमुदत उपोषण छेडण्यात आले. दरम्यान, बागलाणचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करू असे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा उपोषण मागे घेण्यात आले.

शहरात सध्या अनधिकृत भाजीपाला लिलाव सुरु असून दहा टक्के सर्रासपणे आडत कापून शेतकऱ्यांची लुट सुरु असल्याचा आरोप करीत ही लुट थांबवावी या मागणीसाठी  बागलाण तहसील कार्यालयासमोर प्रहार शेतकरी संघटनेतर्फे बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात दररोज सकाळी भाजीपाला मार्केट भरवून शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव केला जातो. यातून विक्री केलेल्या मालाच्या रकमेतून १० टक्के अनधिकृतपणे आडत कपात केली जात असल्याचा आरोप करीत प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांनी या वसुलीबाबत मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून तक्रार केली होती. मात्र या गंभीर प्रकाराकडे संबधितांनी चक्क डोळेझाक केली आहे. वास्तविक राज्य शासनाने शेतकऱ्यांकडील सर्व शेतमालाला आडत मुक्त केले आहे. तसा अध्यादेश राज्यपालांनी काढला आहे. असे असतांना सटाणा शहरात अनधिकृत भाजीपाला मार्केट भरवून तथाकथित व्यापारी १० टक्के आडत वसुली करीत आहेत. संबधित या व्यापाऱ्यांकडे बाजार समिती अथवा नगर परिषदेचे परवाने नाहीत. अनधिकृतपणे हा व्यवसाय सुरू असून शेतकरी वर्गाची आर्थिक लूट सुरू आहे. आज या दुष्काळी परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला भाव नाही. त्यात या व्यापाऱ्यांची दिवसाढवळ्या लूट केली जात आहे. शासनाने शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवून विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच भाजीपाला लिलाव हा बाजार समिती यांचे परवाने घेऊनच बाजार समिती आवारात करावा या मागणीसाठी काल शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून येथील तहसील आवारात प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर पगार, तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती.

दरम्यान, सायंकाळी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीची गंभीर दखल घेत सहाय्यक निबंधक, पालिकेच्या मुख्याधिकारी, बाजार समितीचे सचिव, तसेच पोलीस निरीक्षक सटाणा यांना चौकशीचे आदेश दिले असून तात्काळ याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी कृष्णा जाधव, संजय दहिवडकर, सुरेश जाधव, कपिल सोनवणे, राहुल सोनवणे, स्वप्नील सोनवणे, विश्वास बोरसे, हेमंत निकम, शाम बगडाने, जितेंद्र निकम आदी उपस्थित होते.

Web Title: Pahar Farmers' Association strike