शहादा : विजेच्या धक्क्याने 1 जण जागीच ठार | Latest Nandurbar news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

one died due to electric shock in shahada

विजेच्या धक्क्याने 1 जण जागीच ठार

शहादा (जि. नंदुरबार) : शहरातील पंचशील कॉलनीत घराच्या दुसऱ्या मजल्यावर रंगकाम करणारा व्यक्ती उच्च दाबाच्या वीजप्रवाहकडे ओढला गेल्याने विजेचा धक्का लागून खाली पडला. त्यामुळे तो जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी (ता. २) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. याबाबत शहादा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

संजय दुल्लभ सामुद्रे (वय ४९, रा. प्रकाशा, ता. शहादा) गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास येथील नानाभाऊ आखाडे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर दोन मजुरांसोबत रंगकाम करीत होते. दरम्यान, सव्वादहाच्या सुमारास घराजवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विजेच्या प्रवाहाकडे ते ओढले गेल्यामुळे खाली पडून जागीच ठार झाले. सामुद्रे यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा: नवापूर : कारचा टायर फुटल्याने अपघातात महिला ठार

दरम्यान, शहादा शहरात शवविछेदन करण्यासाठी पालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर नसल्यामुळे म्हसावद ग्रामीण रुग्णालयात मृतदेह घेऊन जावा लागत आहे. यामुळे मृतदेहाची हेळसांड होऊन संबंधित मृताच्या नातेवाइकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. लोकप्रतिनिधी व शासकीय पातळीवरील वरिष्ठांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हेही वाचा: गाडी घेण्याच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

Web Title: Painter Death On The Spot Due To High Voltage Current In Shahada In Nandurbar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top