जन्मदात्याकडून मुलीचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

दोनगाव बुद्रुक येथील घटना; ‘ऑनर किलिंग’चा संशय

पाळधी - दोनगाव बुद्रुक (ता. धरणगाव) येथे जन्मदात्या पित्यानेच विवाहित मुलीचा खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ही विवाहित मुलगी दुसऱ्या मुलासोबत पळून गेली होती. शिवाय, यापुढेही त्याच मुलासोबत राहण्याचा हट्ट करत असल्याने बदनामीच्या धाकाने पित्याने काल (ता. २६) मध्यरात्री मुलीचा गळा आवळून खून केला व आज सकाळी तो पोलिस ठाण्यात हजर झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्‍वास पितांबर पाटील (वय ४७) याची मुलगी दीपाली ही लग्न झाल्यानंतर गावातीलच दुसऱ्या मुलासोबत पळून गेली होती. तसेच दीपाली ही यापुढेही त्याच मुलासोबत राहण्याचा हट्ट करीत होती. या मुद्यावर ती बापाशी नेहमी भांडण करीत होती. यामुळे समाजात होणाऱ्या बदनामीमुळे पित्याने रात्री एक ते दीडच्या सुमारास घरातील सुताच्या दोरीने गळा आवळून मुलगी दीपालीला ठार केले. ही घटना घडल्यानंतर विश्‍वास पाटील हा पाळधी दूरक्षेत्र पोलिसात स्वतः हजर झाला व घडलेली घटना त्याने कथन केली.

घटनेची माहिती मिळताच चोपडा विभागाचे पोलिस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, धरणगावचे पोलिस उपनिरीक्षक पी. एन. सोमवंशी, पाळधीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. पाळधी पोलिसांनी संशयित विश्‍वास पाटील यास धरणगाव न्यायालयात हजर केले असता त्यास ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

‘माझा नाइलाज झाला’
विश्‍वास पाटील हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता; परंतु मुलगी पळून गेल्याच्या घटनेनंतर समाजात बदनामी झाली. तीन महिने आधी मुलगी दीपाली पळून गेल्याची तक्रार पाळधी पोलिस दूरक्षेत्रात केली होती. त्यानंतर परत आलेली दीपाली पुन्हा पतीऐवजी गावातील मुलासोबतच राहण्याचा हट्ट करीत होती. यामुळे समाजात, गावात झालेली बदनामी सहन न झाल्याने नाइलाज झाला, अशी माहिती विश्‍वास पाटील याने पोलिसांसमोर कथन केली.

Web Title: paldhi jalgav news daughter murder by father