पॅनकार्ड क्‍लबकडून कोट्यवधींचा गंडा

पॅनकार्ड क्‍लबकडून कोट्यवधींचा गंडा

नाशिक : आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या गुन्ह्यात आणखी एका कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पॅनकार्ड क्‍लब प्रा. लि. या हॉटेलिंग व बांधकाम क्षेत्रातील कंपनीविरोधात नाशिकमधील तक्रारदारांनी फसवणूक झाल्या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून, या प्रकरणी पोलिस तपास सुरू झाला आहे.


केबीसी, मैत्रेय, रोहिणी, पर्ल्स, इमू, हाउस ऑफ इन्व्हेस्टमेंट, फडणीस ग्रुप यांसारख्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले असताना, यात पॅनकार्ड क्‍लबची भर पडली आहे. पॅनकार्ड क्‍लब प्रा. लि. या नावाच्या कंपनीने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून मासिक हप्त्यानुसार आर्थिक गुंतवणूक करून घेतली होती. मात्र, अडीच वर्षांपासून या कंपनीने गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकवरील परताव्याची रक्कम दिलेली नाही. या संदर्भात नाशिकमधील सुमारे 45 तक्रारदारांनी पोलिस आयुक्तालयात धाव घेऊन तक्रार दिली.
..............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com