वरखेडेत केळीचे पंचनामे सुरू, 'सकाळ' बातमीचा परिणाम 

दीपक कच्छवा
शुक्रवार, 22 जून 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : वरखेडे (ता.चाळीसगाव) परिसरात मंगळवारी (ता.19) सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाले होते. या संदर्भात 'सकाळ' मध्ये वृत्त झळकताच आज महसुल विभागातर्फे प्रत्यक्ष शेतात जाऊन केळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाल्याने तातडीने भरपाई मिळावी आशी मागणी होत आहे.

वरखेडे परिसरात मंगळवारी (ता. 19) झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात केळीचे मोठे नुकसान झाले. आजच्या 'सकाळ' मधील टुडे पानात यासंदर्भात सविस्तर वृत्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीयेसह प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत तलाठी व्ही.बी.शेळके यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पहाणी करून पंचनामे केले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी आशी मागणी होत आहे. बऱ्याचदा पंचनामे केले जातात त्यानंतर  भरपाईची वाट पहावी लागते. केळीवर शेतकऱ्यांचा जास्त खर्च झाला आहे. त्यातच वादळाच्या तडाख्यात केळीचे नुकसान झाले आहे. केळीचे एक रोप 12 रूपये प्रमाणे खरेदी केले होते. त्यानंतर वेळोवेळी मोठा खर्च केला आहे. त्यामुळे आता शासनाकडून जास्तीची मदत मिळावी आशी मागणी होत आहे.

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे
परिणामी यंदा बहुतांश शेतकर्यानी केळी पिकाची लागवड केली आहे.कालची आप्पती नैसर्गिक असली तरी चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीने कृर्षीविभागाने केळी पिकावर स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करावी व तज्ज्ञांनकडुन मार्गदर्शन करावे आशी अपेक्षा उत्पिभादकांकडुन व्यक्त होत आहे.
 
Web Title: panchanama of banana starts in varkhede after sakal news