विद्यार्थ्यांसह भाविकांनीही गिरविले स्वच्छतेचे धडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पंचवटी - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठाच्या एचपीटी महाविद्यालय अभ्यास केंद्रावरील वृत्तपत्र विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी रामकुंड ते गाडगे महाराज पुलापर्यंतचा परिसर स्वच्छ केला. प्रवासी, भाविकांशी स्वच्छताविषयक संवाद साधला.

बस पार्किंगमध्ये नैसर्गिक विधी करणाऱ्या सुमारे १०० प्रवाशांना सार्वजनिक स्वच्छतागृहांपर्यंत जाण्यास प्रवृत्त करण्यात आले. या वेळी कपालेश्‍वर मंदिर ते गाडगे महाराज पुलापर्यंत जागृती फेरी काढण्यात आली. विभागीय केंद्रप्रमुख डॉ. प्रमिला भामरे, अभ्यास केंद्रप्रमुख प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, संयोजक श्रीकांत सोनवणे, प्रा. अनिल शिरसाठ, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. प्रकाश देशमुख, स्वच्छता अभियानाचे प्रसाद पवार, भक्ती करंजकर, गौरी दाभाडे, सोनू पवार, करण बावरी, प्रियंका मोरे, विजय धारणे, तुषार आहेर, अन्वर पठाण, विजय शिरसाठ, प्रफुल्ल पवार, राकेश शिंदे आदी सहभागी झाले. पोलिस गोदावरी स्वच्छता पथकाचे प्रमुख तथा पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांनी स्वच्छता अभियानासाठी आलेल्यांचे स्वागत केले.

Web Title: panchwati nashik news Cleanliness of the students also fell victim with the students