पंढरपूरला येणाऱ्या एसटी प्रवाशांना मोफत नाश्‍ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

नाशिक - आषाढी एकादशीच्या काळात राज्यभरातून पंढरपूरला येणाऱ्या एसटी प्रवाशांना दिवंगत मीनाताई ठाकरे वारकरी सेवा केंद्र आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे मोफत नाश्‍ता, भोजन व चहापाण्याची सोय केली जाणार आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून 21 ते 24 जुलैदरम्यान रोज दोन सत्रांत राज्यातून पंढरपूरला येणाऱ्या भाविकांसाठी ही सोय केली जाणार आहे. या काळात कार्यरत असलेल्या एसटी चालक-वाहक, पर्यवेक्षकांना ही सेवा दिली जाणार आहे. तसेच या काळात तीन दिवस मोफत वैद्यकीय सेवा पुरविली जाणार असल्याची माहिती एसटी कामगार सेनेचे राज्य संघटक सुभाष जाधव यांनी दिली.
Web Title: pandharpur st passenger free nasta