"पांडुरंग' जळगाव जिल्ह्याला पावणार कधी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

जळगाव - गेल्या चार ते पाच महिन्यांपासून जिल्ह्याच्या विकासासाठी धोरणात्मक न घेण्यात आलेले निर्णय, जिल्ह्याचा रखडलेला विकास यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांसाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्या (19 सप्टेंबर) होणार होती. मात्र, ती रद्द करण्यात आल्याने जिल्ह्याचा विकास पुन्हा रखडण्याची चिन्हे आहेत. 

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसेंवर जूनमध्ये झालेल्या कथित आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नियोजन समितीची बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झाली. त्यानंतर पालकमंत्री नसल्याने आजपर्यंत बैठकच झाली नसल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल अशी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. याशिवाय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होणार होते, तेही मार्गी लागलेले नाही. शिवाजीनगर उड्डाणपूल, भोईटेनगरच्या उड्डाणपुलाचा प्रश्‍न मार्गी लागणार होता, ते रखडले आहे.
 
जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांना, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना आपल्या भागातील प्रश्‍न मांडून आपल्या मतदारसंघातील प्रश्‍न निकाली काढावयाचे असतात. मात्र, सभा न झाल्याने तेही रखडले आहेत.
 
जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून पांडुरंग फुंडकर यांची घोषणा झालेली आहे. मात्र, ते एकदाही जिल्ह्यात आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले "पांडुरंग‘ कधी पावणार? असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. 

दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पालकमंत्र्यांची तारीख न मिळाल्याने नियोजन समितीची बैठक पुढे घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Web Title: "Pandurang 'when planted in Jalgaon district?