यावलला पाणी प्रश्‍न पेटला 

यावलला पाणी प्रश्‍न पेटला 

यावलला पाणी प्रश्‍न पेटला 
यावल : येथील पाणी प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालला आहे. बाबुजीपुरा व संत रोहिदास नगरातील संतप्त महिलांनी आज साकळी येथे पालिकेच्या प्रवेशद्वारावर मातीचे मडके फोडून प्रशासनाचा निषेध केला. तात्काळ पाणी प्रश्न निकाली काढावा यासाठी पालिका कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. 
ऐन रमजान महिन्यात पालिकेने पाणी कपात करून दोन दिवसाआड ऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरातील बाबुजीपुरा व संत रोहिदास नगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वारंवार निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याने आज नागरिकांचा संताप अनावर होऊन त्यांनी थेट पालिकेवर मोर्चा काढला. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने पाण्याची अत्यंत आवश्‍यकता असल्याचा मुद्दा नागरिकांनी मांडला. 
पाच दिवसांआड पाणी 
शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी बाबुजीपुरा, खाटीक वाडा, संत रोहिदास नगर या भागात थेट पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली. पालिकेच्यावतीने सदर समस्या सोडवण्यासाठी तात्काळ पाइपलाइन पाहणी करिता पाणीपुरवठा विभागाचे राजेंद्र देवरे यांना पाठविण्यात आले. खाटीक वाड्यामध्ये मुख्य पाइपलाइनच्या व्हाल जोडणीला काही नागरिकांनी विरोध केल्याने ही समस्या उद्भवली आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे आज झालेला उद्रेक पाहता पोलिस बंदोबस्तात जोडणीचे काम केले जाईल, असे नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांचे पती शरद कोळी यांनी सांगितले. 
शबाना बी फक्रुद्दीन, भारतीबाई डांबरे, शबनम बी, अनिता डांबरे, सरला सुरवाडे पाराबाई डांबरे, पल्लवी जंजाळे, अयुब खान, अश्‍फाक खान, अर्शद खान, शेख शकील, संजय सुरवाडे यांच्यासह प्रभाग क्रमांक दोन मधील महिला, पुरुषांनी आंदोलनात सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com