आधी श्रमदान नंतरच वडीलांचे अस्थि विसर्जन

जलील पठाण
सोमवार, 9 एप्रिल 2018

औसा (फत्तेपुर) - औसा-लामजना रस्त्यावर फत्तेपुर पाटीजवळ रस्ता ओलांडतांना येथील अंकुश रावण साळुंके यांचे अपघाती निधन झाले. बाराव्या दिवशी रविवारी (ता. आठ) अस्थि विसर्जन करण्यात येणार होते. तर दुसरीकडे पाण्यासाठी गावात वणवण करण्याची वेळ आहे. या स्थितीत वडीलांचे अस्थि विसर्जन बाजूला ठेवून उमेश अंकुश साळुंके या बारा वर्षाच्या मुलाने पाणीदार गावाच्या चळवळीत योगदान देत श्रमदान केले. उमेश साळुंके असे या मुलाचे नाव आहे.

वडिलांच्या निधनाचे दुःख उराशी बाळगुन गावात पाणी यावे यासाठी पाणी फौंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत श्रमदान केले. दुष्काळाचे कायमस्वरुपी निर्मुलन व्हावे यासाठी या चिमुकल्याने दाखविलेले औदार्य निश्चितच फत्तेपुरसह तालुक्यातील स्पर्धेत उतरलेल्या गावांना व पाणी फौंडेशनला प्रेरणा देणारे आहे. तसेच उमेशने केलेल्या कामाचे संपूर्ण गावने भरभरुन कौतुक केले.

वॉटरकप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रात अनेकांनी श्रमदान केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, उमेशच्या श्रमदानाचे मोल स्पर्धेला बळ देणारे ठरले. शनिवारी (ता. सात) मध्यरात्रीपासूनच औसा तालुक्यात वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातुन गावोगाव श्रमदानासाठी लोकांची चढाओढ पहायला मिळाली.

Web Title: pani foundation umesh contributed to the village movement