नांदगाव मतदारसंघ : महायुतीचे सुहास कांदे आघाडीवर; पंकज भुजबळ पिछाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

नाशिक : विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) सकाळी आठपासून सुरु झाली. नांदगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे पंकज भुजबळ, शिवसेनेचे सुहास कांदे, वंचित आघाडीचे राजेंद्र पगारे, अपक्ष रत्नाकर पवार हे उभे आहेत. पण खरी लढत भुजबळ आणि कांदे यांच्यात होत आहे. पंकज भुजबळ पिछाडीवर असून कांदे २३०० मतांनी आघाडीवर आहेत. 

नांदगाव विधानसभा मतदार संघ : शिवसेनेचे सुहास कांदे लीडवर

या मतदारसंघातील एक लाख 89 हजार 252 मतदारांनी मतदान केले. एकूण 59.89 टक्के मतदान झाले. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या मतदानातील टक्केवारी घसरलेली आहे. पावसाळी वातावरण, रुसलेले मतदार या सर्वांचा परिणाम शहरातील टक्केवारी घसरली. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल याचा अंदाज उमेदवारांच्या निकटवर्तीय समर्थकांनाही ठामपणे बांधता येत नसल्याचे चित्र आहे. 

गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले. या वेळच्या निवडणुकीत आघाडी व महायुती झाल्याने मतविभाजन टाळले गेले असे असले, तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत उघडपणाने बेबनाव दिसला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaj Bhujbal on the back of Suhas Kandi on the front of Mahayuti