पंकजा मुंडेंकडून शरद पवार यांची स्तुती; 'या' अभिनेत्यासोबत केली तुलना

पंकजा मुंडेंकडून शरद पवार यांची स्तुती; 'या' अभिनेत्यासोबत केली तुलना

नाशिक- राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्याचबरोबर, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी शरद पवार हे राजकारणातील दिलीपकुमार आहेत, असेही म्हटले. ते सर्वोच्च मार्गदर्शक असल्याचं कौतूक त्यांनी यावेळी केले.

नाशिकच्या व्ही. एन. नाईक या शिक्षण संस्थेत आज गोपिनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात व्यासपीठावर शेजारी बसले होते. नाशिकमध्ये पंकजा मुंडे आणि शरद पवार पहिल्यांदाच एकत्र आले होते. त्यामुळे वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. 

यावेळी सर्वात आधी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाषण केले. यावेळी आव्हाड यांनी शरद पवार, गोपीनाथ मुंडे यांच्या मोठेपणाच्या विविध आठवणी आणि प्रसंग सांगितले. आव्हाड म्हणाले, "गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे प्रेमाचे संबंध होते. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा असलो तरी त्यांनी प्रेम कधी कमी केले नाही. तोच धागा आजही कमी झालेले नाही. पंकजाताई आणि माझे फार जवळचे संबंध नाहीत. मात्र, कधीही गेलो तरी एक, दीड कोटी रूपये मिळतील अशा कागदावर त्या केव्हाही सही करतात. "

हे ऐकून पंकजा मुंडे यांना आपले हास्य लपवता आले नाही. त्यांच्या शेजारीच बसलेल्या शरद पवार यांनी तातडीने सहीसाठी पंकजा मुंडे यांच्यापुढे रायटिंग पॅड पुढे केले. पवारांच्या या मिश्कीलपणाने उपस्थितांनी हास्याने सभागृह डोक्यावर घेतले. तसेच, पवार यांनीही आपल्या भाषणात बोलताना पंकजा मुंडे यांचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com