भीतीमुळेच पवारांना स्वतः बीडला यावे लागले : पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

मला त्यांची अजिबात काळजी नाही. माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे निकृष्ट कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच पवारांना काळजी आहे. त्यांना स्वतः बीडला यावे लागले. उमेदवार जाहीर करावा लागला. शेवटी निकाल माझ्या बाजुनेच लागणार आहे.

नाशिक : मला कसलीच भिती वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला माझी भिती वाटते. त्यामुळे स्वतः शरद पवारांनी बीडला येऊन उमेदवार जाहीर केले असे महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले.

शरद पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना, पाच उमेदवारांची घोषणा केली. पवारांच्या घोषणेमुळे परळी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. धनंजय मुंडेंच्या उमेदवारीवर पंकजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमध्ये सभा आहे. त्यासाठी त्या येथे आल्या आहेत. त्या म्हणाल्या, की मला त्यांची अजिबात काळजी नाही. माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे निकृष्ट कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच पवारांना काळजी आहे. त्यांना स्वतः बीडला यावे लागले. उमेदवार जाहीर करावा लागला. शेवटी निकाल माझ्या बाजुनेच लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde targets Sharad Pawar on declares NCP candidate for Maharashtra Vidhan Sabha 2019