समांतर बोगद्याच्या कामाला गती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

लेव्हलिंगचे काम पूर्णत्वास; ब्लॉकचे काम लवकर सुरू होणार
जळगाव - येथील श्रीकृष्ण कॉलनी जवळील बजरंग बोगद्याच्या समांतर बोगद्याच्या कामाला सुरवात झाली आहे. वीस ते पंचवीस दिवसापूर्वी सुरू झालेल्या कामाने गती पकडली असून बोगद्याच्या लेव्हलिंगचे काम पूर्णत्वास आले आहे. बोगद्याचे ब्लॉक बनिवण्याच्या कामाला देखील सुरवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

गणेश कॉलनी, पिंप्राळा, भोईटेनगर परिसरातील नागरिकांना अरुंद बजरंग बोगद्यातून वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागत होती. गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांच्या मागणीतून समांतर बोगद्याचे काम सुरू झाले आहे. महापालिकेच्या तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून तीन कोटी ७५ लाखाचा निधी या बोगद्यासाठी मंजूर करून पुलाच्या कामाला रेल्वे प्रशासनाकडून सुरवात झाली. बोगद्याचे लेव्हिलंगचे कांक्रीटचे काम पूर्णत्वास आले आहे. 

बोगद्याचे काम नऊ महिने 
दोन बोगद्याच्या कामाला नऊ महिने लागणार आहे. बोगद्याचे काम दिवस-रात्र ही वीस माणसे काम करणार आहेत. ६० मीटर अंतरावर बांधकामाचे साहित्य गुदाम, कार्यालय तसेच कामगारांना राहण्यासाठी जागा करण्यात आली आहे.

ब्लॉकचे काम लवकर सुरू होणार
समांतर बोगद्यामध्ये सिमेंटचे तीन ब्लॉक बसवून बोगदा तयार केला जाणार आहे. सुरवातीला बोगद्याच्या प्रवेशाचे लेव्हिलींग केल्यानंतर सिमेंटचे ब्लॉक तयार करून बसविले जाणार आहेत. हे काम होताना वरील रेल्वे वाहतूक सुरळीत राहणार असल्याची माहिती अभियंत्यांनी दिली.

Web Title: parallel tunnel work speed