पालक, विद्यार्थ्यांना लागले वासंतिक शिबिरांचे वेध 

पालक, विद्यार्थ्यांना लागले वासंतिक शिबिरांचे वेध 

नाशिक - सीबीएसई विभागातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत, तर एसएससी विभागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांना 5 एप्रिलपासून सुरू होत आहेत. त्यामुळे आता सीबीएसई विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा वासंतिक शिबिरांकडे वळवला आहे. वर्षभर विद्यार्थी अभ्यास, पाठांतर, विविध प्रकल्प करतात. त्यांनाही काहीतरी बदल हवा असतो, हेच संस्था, मंडळे लक्षात घेतात. 

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना काहीतरी टेन्शन फ्री हवे असते, यासाठी विद्यार्थी उन्हाळी शिबिरात हौसेने सहभागी होतात. काही शिबिरे विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या आई-बाबांसाठी असतात. बहुपर्यायांच्या जमान्यात अभ्यासाबरोबरच विद्यार्थी कला, क्रीडा, संगीत, विविध प्रकारच्या भाषा या सर्वच गोष्टींना अधिक महत्त्व देतात. मुलांना लहानपणापासूनच विविध गोष्टींत व्यस्त ठेवले तर त्यांच्या मेंदूला चालना मिळते. या कलांचा पाया लहानपणीच मजबूत असेल तर भविष्यात स्पर्धेच्या जमान्यात मुलांना टिकून राहायला फारसे जड जात नाही. पूर्वी शाळांना सुट्या लागल्या, की मुलांचे गावाला जाण्याचे नियोजन ठरलेले असायचे. काही जण कुटुंबासमवेत पर्यटनाला जात. पण आता या पद्धतीत थोडा बदल होत आहे. मुलांबरोबरच त्यांचे पालकही अशा शिबिरात सहभागी होतात. 

या प्रकारांचा समावेश 
आर्ट ऍण्ड क्राफ्ट, क्रीडामध्ये बॅडमिंटन, मलखांब, टेबल टेनिस, स्वीमिंग, स्केटिंग, नृत्यात कथक, वेस्टर्न, भरतनाट्यम, वाद्यांमध्ये तबला, गिटार, हार्मोनियम, व्हायोलिन, तसेच फंक्‍शनल इंग्लिश, फॉरेन लॅंग्वेज, व्यक्तिमत्त्व विकास, पेंटिंग या प्रकारची शिबिरे घेतली जातात. 

दर वर्षी शाळेत उन्हाळी शिबिर घेतले जाते. त्याचबरोबर शाळेत आम्ही ऍक्‍टिव्ह मदर्स ग्रुप चालवतो. त्या ग्रुपमधील महिलांना त्यांच्या मुलांबरोबरच शिबिरात सहभागी होण्याची संधी देतो. 15 ते 30 एप्रिलदरम्यान विविध शिबिर शाळेत घेण्यात आली आहेत. 
- विजयालक्ष्मी मणेरीकर (संचालिका, ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल) 

शाळेव्यतिरिक्त मुलांना काहीतरी बदल हवा असतो. म्हणून एक आठवड्याचे शिबिर मी घेत आहे. त्यात मुले उत्साहाने सहभागी होतात. यामुळे मुलांची कल्पनाशक्‍ती तर वाढते, तसेच विरंगुळा मिळतो. 
- शीतल सोनवणे (चित्रकार, शिबिर संयोजक) 

छोटेखानी शिबिर हा उन्हाळ्यातील चांगला उपक्रम असतो. माझी मुलगी या वेळी आर्ट ऍण्ड क्राफ्टच्या शिबिरात सहभाग घेणार आहे. मी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात सहभागी होणार आहे. 
- मनीषा परदेशी (पालक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com