‘एसटी’च्या ताफ्यात येणार शंभर ‘परिवर्तन’ बस

ST
ST

जळगाव - गेल्या काही वर्षांत ‘शिवशाही’ व नवीन बांधणीतील ‘लालपरी’ या बस वगळता नवीन बसची खरेदी न करता जुन्या बसचे सांगाडे बदलून त्या पुन्हा वापरात आणल्या जात होत्या. यामुळे अवघ्या दोन- तीन वर्षांत बस भंगार झालेल्या पाहावयास मिळत होत्या; परंतु आता महामंडळातर्फे सातशे नवीन बस बांधण्यात येणार असून, यातील शंभर ‘परिवर्तन’ बस जळगाव विभागात येणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळाने खासगी बसप्रमाणे प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी नवीन बस खरेदी केल्या आहेत. यात ‘शिवशाही’, ‘लालपरी’ यासारख्या नवीन बांधणीच्या बस आणल्या. तरी देखील जुन्या बसेसच्या मूळ सांगाड्यावर नवीन ‘बॉडी’ बांधून त्या बसेसचा पुनर्वापर सुरू होता.

यामुळे आयुर्मान संपलेल्या बस रस्त्यात बिघडून बंद पडत असल्याचे प्रकार सातत्याने पाहावयास मिळतात. या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिळालेल्या निधीतून एसटीने तब्बल ७०० बसेस खरेदी करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेत तीन प्रकारच्या बस बांधणीसाठी विहित तांत्रिक मुद्द्याच्या आधारे सांगाडे (चेसिस) मागविण्यात आले असून, त्यामध्ये साधी, शयनयान व वातानुकूलित यांचा समावेश आहे.

शंभर बस येणार सेवेत
महामंडळाच्या जळगाव विभागात सध्या स्थितीला ८५५ बस आहेत. यात ‘शिवशाही’ व ‘लालपरी’ वेगळ्या आहेत. परंतु साध्या परिवर्तन बसमधील बहुतांश बसचे आयुर्मान संपलेले असून, त्या भंगारात काढण्यात येतील. यामुळे बससेवेवर काही परिणाम होऊ नये, यासाठी नवीन बसची मागणी विभागाकडून करण्यात आली आहे. यात साधारण विभागासाठी साधारण शंभर बसची मागणी करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी सांगितले.

पाचोरा- पुणे स्लिपर कोच
महामंडळात आलेली शिवशाही स्लिपर कोच बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. यात जळगावसह चोपडा, भुसावळ येथून पुण्यासाठी ‘शिवशाही स्लिपर कोच’ बससेवा सुरू करण्यात आली आहे. यानंतर आता पाचोरा- पुणे अशी स्लिपर कोच सेवा येत्या दोन- तीन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे पाचोऱ्याहून जाणाऱ्या प्रवाशांना देखील ही बस उपयुक्‍त ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com