नाशिककरांची पार्किंगची समस्या सुटणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

महापालिकेकडून पार्किंग लॉट्‌स विकसित; तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहतुकीचे नियोजन 

नाशिक - दिवसागणिक शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने वाहतूक कोंडी, वापरास रस्ता नसणे व प्रदूषणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी महापालिकेने पार्किंगचे नियोजन केले असून, टप्प्याटप्याने पार्किंग लॉट्‌स विकसित केले जाणार आहेत. ऑनस्ट्रीट पार्किंगच्या माध्यमातून ३४ ठिकाणे विकसित केली जाणार आहेत. 

महापालिकेकडून पार्किंग लॉट्‌स विकसित; तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहतुकीचे नियोजन 

नाशिक - दिवसागणिक शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने वाहतूक कोंडी, वापरास रस्ता नसणे व प्रदूषणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी महापालिकेने पार्किंगचे नियोजन केले असून, टप्प्याटप्याने पार्किंग लॉट्‌स विकसित केले जाणार आहेत. ऑनस्ट्रीट पार्किंगच्या माध्यमातून ३४ ठिकाणे विकसित केली जाणार आहेत. 

पहिल्या टप्प्यात शालिमार चौक ते महाबळ चौक, जेहान सर्कल ते एबीबी सर्कल भागातील वाहनतळे विकसित केली जाणार आहेत. या प्रकारात पदपथ व रस्त्याच्या कडेला लागलेल्या वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. मोबाईल ॲपद्वारे ‘क्‍यूआर’ पोस्टवरील कोडचे छायाचित्र काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाहनचालकांना पार्किंगचे बिल मिळेल. त्यात कॅशलेस बिल अदा करण्याची सोय उपलब्ध राहील. ऑनस्ट्रीट पार्किंगच्या माध्यमातून सुमारे साडेनऊ किलोमीटर लांबीची पार्किंग स्थळे उपलब्ध होतील. ऑफस्ट्रीट पार्किंगमध्ये वर्दळीच्या भागात महापालिकेचे मोकळे भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. क्‍यूआर पोस्ट व बूम बॅरिअरच्या सहाय्याने वाहनांचे नियंत्रण केले जाईल. वाहनांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. पार्किंगसाठी २३ हजार ४४५ चौरस मीटर जागा उपलब्ध होईल. ऑफस्ट्रीट पार्किंगसाठी सहा स्थळे निश्‍चित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात मुंबई नाका, कॅनडा कॉर्नर येथील बंदिस्त स्थळे वापरली जाणार आहेत. रामकुंड, भालेकर मैदान, सीतागुंफा मंदिर येथे खुले वाहनतळ विकसित केले जाईल. पार्किंगच्या तिसऱ्या प्रकारात रोटरी पार्किंग सिस्टिम राहील. मध्यवर्ती भागात भूखंड उपलब्ध नसल्याने यांत्रिकी पद्धतीने कमी जागेवर एकावर एक अशी वाहने उभी करण्याची यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.

वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगचे नियोजन आवश्‍यक आहे. तिन्ही पार्किंग व्यवस्था मोबाईल पार्किंग ॲपद्वारे नियंत्रित केली जाईल.
- अभिषेक कृष्णा, आयुक्त.

ऑफस्ट्रीट पार्किंगची ठिकाणे
बी. डी. भालेकर हायस्कूल मैदान, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, जिजामाता हॉस्पिटल, सीतागुंफा मंदिरासमोर.

रोटरी पार्किंग स्थळे
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय आवार, पंडित कॉलनी, शालिमार (जिमखाना शेजारी), सराफ बाजार (सरकारवाड्यासमोर).

स्मार्टसिटीअंतर्गत प्रकल्प
राजीव गांधी भवन, इंद्रकुंड, निमाणी चौक, मालेगाव स्टॅण्ड, सोमानी उद्यान (नाशिक रोड).

ऑनस्ट्रीट पार्किंगची ठिकाणे
भद्रकाली ते गाडगे महाराज चौक, सीबीएस ते अशोक स्तंभ, अब्दुल हमीद चौक ते दामोदर चित्रपटगृह, दामोदर चित्रपटगृह ते भद्रकाली मंदिर, होळकर पूल ते इंद्रकुंड, इंद्रकुंड ते पंचवटी कारंजा, काट्या मारुती चौक ते निमाणी बसस्थानक, कावेरी हॉटेल ते बेलमास्तर चौक, मखमलाबाद नाका ते पंचवटी विभागीय कार्यालय, पंचवटी कारंजा ते निमाणी बसस्थानक, रविवार कारंजा सर्कल, शालिमार ते महाबळ चौक, गाडगे महाराज चौक ते दामोदर चित्रपटगृह, होळकर पूल ते सरदार चौक, महाबळ चौक ते रविवार कारंजा, काळाराम मंदिर परिसर, अशोका मार्ग, ट्रॅक्‍टर हाउस रोड, महात्मा गांधी रोड, सारडा सर्कल ते अब्दुल हमीद चौक, रवींद्र विद्यालय, पेठ नाका, सीबीएस ते शालिमार, सारडा सर्कल ते मुंबई नाका, शालिमार ते खडकाळी, बिटको चौक ते महात्मा गांधी पुतळा, सीबीएस कॉर्नर ते कॅनडा कार्नर, गंगापूर रोड, कॅनडा कॉर्नर ते पॅनासॉनिक गॅलरी, डॉ. आंबेडकर रोड, गंगापूर नाका ते कॅनडा कॉर्नर, पंडित कॉलनी रोड, सरदार चौक ते गाडगे महाराज पूल, तिगरानिया रोड.

Web Title: Parking issue will be solved