९ मेला शहापूर ते आझाद मैदान मुंबई राज्यस्तरीय पायी मोर्चात सहभागी व्हावे

रोशन खैरनार
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

सटाणा : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, या मागणीसाठी येत्या ९ मे रोजी शहापूर ते आझाद मैदान मुंबई या दरम्यान काढण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पायी मोर्चास राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बागलाण तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व एनडीएसटी सोसायटीचे संचालक संजय देसले यांनी आज गुरुवारी (ता.५) येथे केले.

येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालयात बागलाण व देवळा तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहविचार सभेत श्री.देसले बोलत होते. अध्यक्षस्थानी मंगेश सूर्यवंशी तर व्यासपीठावर मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह महेंद्र कुवर, मुख्याध्यापक सुनील शिंदे, जनार्दन वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंगेश सूर्यवंशी म्हणाले, शासनाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती मिळालेल्या मात्र त्यानंतर राज्यातील २० टक्के, ४० टक्के, ६० टक्के, ८० टक्के व १०० टक्के अनुदानपात्र अनुदानित, विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित सेवानिवृत्ती वेतन योजना, कुटूंब निवृत्ती वेतन योजना आणि भविष्य निर्वाह निधी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सन २००५ नंतर शाळा १०० टक्के अनुदानित झालेली असताना शासनाने त्यापूर्वी नियुक्ती मिळालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना सुरु करणे आवश्यक होते. मात्र शासनाने शिक्षकांची पेन्शन बंद केल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ मे रोजी आयोजित पायी मोर्चाद्वारे शासनाला आपल्या न्याय्य मागण्या मान्य करायला भाग पाडू, असा इशाराही सूर्यवंशी यांनी दिला. महेंद्र कुवर आदींची भाषणे झाली.

सभेस संजय पवार, डी. बी. ह्याळीज, सचिन शेवाळे, प्रकाश पानपाटील, विनोद सावंत, महेंद्र हिरे, माधव हिरे, एन.के.आहेर, विनोद शिंदे, विलास सावंत, दीपक पवार, पी. बी. देवरे, बी. के. बिरारी, पी. डी. सूर्यवंशी, काकाजी भामरे, पुष्पा सोनवणे, एम.एन. जोंधळे, पी. बी. कदम, मुरलीधर भामरे, राहुल सोनवणे, दिलीप बोरसे, आर. डी.मगर, भारत निकम, जगदीश हिरे आदींसह बागलाण व देवळा तालुक्यातील शेकडो शिक्षक उपस्थित होते.

Web Title: participate in rally from shahapur to azad ground mumbai on 9 may