शिवसेना-कॉंग्रेसबरोबर भागीदारीची "राष्ट्रवादी'कडून खेळी शक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

नाशिक - "मिनी मंत्रालय' सत्ताकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस- भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यात शिवसेनेसह कॉंग्रेसला यश मिळाले. या यशाला 24 तास होत नाहीत, तोच तटस्थ राहण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना- कॉंग्रेसला मतदान केल्याबद्दल अनिता गोरख बोडके आणि ज्योती गणेश जाधव या सदस्यांची मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना-कॉंग्रेसबरोबर सहभागी होत सभापतिपदांमध्ये भागीदारी करण्याची खेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खेळली जाण्याची शक्‍यता आहे. 

माकपचे जिल्हा सचिव सुनील मालुसरे यांनी सौ. बोडके आणि सौ. जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्रक आज प्रसिद्धीस दिले आहे. आता या प्रक्रियेनंतर पुढे काय होणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. पुढील आठवड्याच्या सुरवातीपर्यंत पक्षाचे नेते बैठकीच्या निमित्ताने मुंबईत आहेत. त्यानंतर होणाऱ्या पक्षाच्या जिल्हा समितीच्या बैठकीत पुढील दिशा निश्‍चित होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या दोन्ही सदस्यांना तटस्थ राहण्याच्या विरोधात भूमिका घेतल्याबद्दल बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. दरम्यान, माकपच्या निर्णयाचे पत्र आम्हाला मिळाले नसून, ते मिळाल्यावर आम्ही आमची बाजू मांडणार असल्याचे सौ. बोडके आणि सौ. जाधव यांच्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

आता पुढे काय? 
जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी तटस्थ राहण्याविषयीचा पक्षाचा आदेश बजावण्यात आला असेल, तर त्यासंबंधाने माकप पुढील कारवाईसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करू शकेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. याचसंबंधाने अधिक माहिती घेतल्यावर माकपने प्रक्रिया पूर्ण केल्या असल्याचे सांगण्यात आले. पण, पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सदस्यांना सभापतिपदाच्या आगामी निवडणुकीत सहभागी होता येणार अथवा नाही, या संबंधीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. ही सारी गोंधळाची परिस्थिती तयार झाली असल्याने अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील समर्थनासाठी माकप आणि अपक्ष रूपांजली माळेकर यांना एक विषय समिती देण्यासंबंधीच्या शब्दाचे पुढे काय होणार? हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. त्याचवेळी कायदेशीर तिढा कायम राहिल्यास शिवसेनेकडून सौ. बोडके आणि सौ. माळेकर यांना प्रत्येक एक विषय समिती दिली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दुसरीकडे सत्तेचे गणित न जुळाल्याने अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी "राष्ट्रवादी'चे सदस्य शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी उघडपणे बोलू लागले होते. आता बोलण्याच्या पलीकडे शिवसेना-कॉंग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय "राष्ट्रवादी'ने घेतल्यास त्यास कितपत प्रतिसाद मिळणार, हेही पाहणे औत्सुक्‍याचे असेल. 

आदिवासी गटांमध्ये विकासकामे आणायची आहेत. त्यासाठी आम्हाला सत्तेत सहभागी होणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी मतदानात भाग घेतला. 
- अनिता बोडके व ज्योती जाधव, जिल्हा परिषद सदस्या 

Web Title: Partnership with the Shiv Sena-Congress