ट्रॅव्हल्स अडवून प्रवाशाला लुटले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नंदुरबार - चिंचपाडा (ता. नवापूर) येथील रेल्वेगेटजवळ ट्रॅव्हल्स अडवून मोटारसायकलवरील दोघांनी भाईलाल पटेल यांना धक्के मारीत खाली उतरविले. शेतात नेऊन त्यांच्याजवळील दोन लाख हिसकावून त्यांना विद्युत खांब्याला बांधून ठेवले. सकाळी मोटारसायकलवरील तरुणांनी त्यांची सुटका केली. ही घटना 23 एप्रिलला घडली असून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुरत येथील महिधरपूरा येथे ऑफीसमध्ये पैसे पाठवून दे असे महेंद्रभाई पटेल यांनी संजय केशवलाल प्रजापती भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. यावरून कर्मचारी भाईलाला पटेल दोन लाख रुपये घेऊन 23 एप्रिलला जात होते. शुभम ट्रॅव्हल्समधून सुरत येथे जात असताना पहाटे अडीचच्या सुमारास चिंचपाडा रेल्वेगेट जवळ दोन लोक त्यांच्याजवळ आले. सीटचा पडदा उघडून त्यांना उठविले.मज्जाव केला असता त्यांनी ट्रॅव्हल्समधून धक्काबुक्की करत खाली ओढूले. सुरवातीला मोबाईल हिसकाविला. त्यांनी भाईलाल यांना लक्‍झरीच्या पाठीमागे नेऊन मोटारसायकलवर बसवून शेतात नेले. त्यांच्याजवळील दोन लाख हिसकावून घेतले. अंगातील कपडे काढून भाईलालला विद्युत खांबाला दोरीने बांधून ठेवले. तू जर ओरडला तर गोळी मारु अशी धमकी दिली. सकाळी मोटरसायवरील तिघांनी त्यांची सुटका केली. तेथून हायवे रोडच्या हॉटेलमध्ये आणले. येथून भाईलालला राजूभाई यांचा भ्रमणध्वनीवरून संजयभाई यांच्याशी संपर्क साधला. याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

असे आहेत चोरटे 
त्या दोघांपैकी एकाने हेल्मेट अंगात पांढरा शर्ट घातलेला होता. उंच होता. तसेच गाडी चालवणारा काळे जॅकेट घातलेला होता. दोन्ही जण 25 ते 30 वर्षांचे हिंदी बोलणारे होते. त्यांनी चिंचपाडा रेल्वेगेटपासून तीन चार किलोमीटर पाठीमागे पेट्रोलपंचाच्या समोर फाट्यावर हायवे पासून 200 ते 300 मीटरपर्यंत नेऊन गाडी उभी केली. धक्काबुक्की करून पैसे हिसकावून मोटारसायकलवर पोबारा झाले. 

Web Title: passenger loot