पतंजलीच्या अनलिमिटेड सिमला समृद्धी कार्डचा स्पीड ब्रेकर

ramdevbaba
ramdevbaba

येवला : फक्त १४४ रुपयांमध्ये देशभर अमर्यादित व्हॉईस कॉल्स, प्रतिदिन दोन जीबी इंटरनेट डेटा आणि १००  एसएमएसची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.ती नव्याने बाजारात आलेल्या पतंजली बीएसएनएल सिमकार्डमधून...  
रामदेव बाबा यांनी भारत संचार निगम लिमिटेडबरोबर हे कार्ड संयुक्तरीत्या बाजारात आणले आहे.आतापर्यंत कमी पैशात मोठ्या प्रमाणात सुविधा देणारी योजना असली तरी याला पतंजली समृद्धी कार्डचा स्पीडब्रेकर आडवा येत आहेत.     

बीएसएनएल आणि पतंजली यांनी एकत्रित येत ग्राहकहिताची अनोखी योजना बाजारात आणली असून यापूर्वी कधीही नसलेले लाभ या योजनेने मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.पतंजली बीएसएनएल योजनेत देशभर अमर्यादित कॉल्स, प्रतिदिन दोन जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा आणि विनामूल्य पतंजली पीआरबीटी मिळणार आहे.ही योजना तीन प्रकारांत उपलब्ध करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत प्रीपेड सिमकार्डला १४४ रुपयांत ३० दिवस,७९२ रुपयांत १८० दिवस, १५८४ रुपयांत ३६५ दिवसांची वैधता मिळणार आहे,हे आकडे ग्राहकांना आकृष्ट करणारे आहे.

मात्र,या योजनेचे सीम कार्ड घेण्यासाठी भारत स्वाभिमान न्यास योग समिती,महिला पतंजली, युवा भारत आणि पतंजली किसान सेवा पतंजली संघटनेचे सदस्यत्व आवश्यक आहे.संस्थेचे कर्मचारी त्यांच्या योग्यता कार्डाच्या आधारे पात्र ठरणार आहेत. तर पतंजलीने स्वदेशी समृद्धी कार्ड सुरू केले असून हे देखील सीमसाठी आवश्यक आहे.हे कार्ड धारक पतंजलीच्या उत्पादनांच्या खरेदीवर धारकांना दहा टक्के सवलत मिळणार आहे, तसेच कार्डधारकांना पाच लाख रुपयांचे जीवन विमा आणि सहा महिने कमीतकमी सहा हजार रुपयांच्या खरेदीवर अडीच लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे.पतंजली संघटनाचा सदस्य नसलेल्या कोणीही स्वदेशी समृद्धी कार्ड घेऊन बीएसएनएल योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.

पतंजलीचे सदस्य नसलेले अनेकजण कार्ड घ्यायला जातात पण हि मुख्य अट ऐकून अनेकांचा हिरमोड होत आहे.सदस्य घेण्यापेक्षा समृद्धी कार्डचा पर्याय अनेकांना योग्य वाटत आहे.मात्र,याची नोंदणीचे खास पर्याय नसल्याने इच्छा असूनही सीम घेण्यापासून अनेकजण वंचित राहत असल्याचे चित्र आहे.

 "आम्ही ग्राहकांना आमच्या विक्री केंद्रावर लवकरच समृद्धी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत,याबत भारत स्वाभिमान न्यासचे येथील प्रभारी तरंग गुजराथी यांच्यासोबत बोलणे सुरू आहे.ग्राहकांची या योजनेला चांगली पसंती असून त्यांची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ."
- अविनाश पाटील, उपमंडल अभियंता, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com