रुग्णांशी संवाद हवा - कोटेचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नाशिक - वैद्यकीयशास्त्रातील चिकित्सक पद्धतीनुसार आपणच सुपर पॉवर आहोत. रुग्णांना आपले ऐकावेच लागेल, त्यांना औषधे दिली की बरे वाटेलच, असा समज करून घेऊ नका. डॉक्‍टर म्हणून आपण समाजातील श्रेष्ठ घटक बनणार असल्याने रुग्णांवर औषधोपचार करण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधावा. रुग्णांची सर्वोतोपरी सेवा करीत चांगले डॉक्‍टर व्हावे, असा सल्ला नवी दिल्लीतील आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सोमवारी दिला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १८व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर अध्यक्षस्थानी होते. 

आयुष विभागाशी निगडित सर्वाधिक महाविद्यालये महाराष्ट्रात असून, त्या खालोखात कर्नाटक व अन्य राज्यांचा क्रमांक आहे. वैद्यकीय शिक्षण गेल्या काही वर्षांत भरभराटीला आल्याने अनेक नवीन महाविद्यालये, नवीन शैक्षणिक संस्था सुरू झाल्या. परंतु, आता मान्यतेसंदर्भात प्रश्‍न निर्माण होतोय. आयुष मंत्रालय व विद्यापीठांनी समन्वय साधत व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची गरज वैद्य कोटेचा यांनी व्यक्‍त केली.

अनुजाला व्हायचंय आयएएस
सांगलीतील गुलाबराव पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयातील अनुजा बंडगर हिने सहा सुवर्णपदके पटकावली. बीएचएमएस अभ्यासक्रम पूर्ण करताना तिने एकूण बारा पदके पटकावली आहेत. बेडग (ता. मिरज) येथील अनुजाचे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आयएएस होऊन प्रशासकीय सेवेतून समाजसेवा करण्याचे ध्येय आहे. दीक्षान्त समारंभाला संपूर्ण बंडगर कुटुंबीयांनी हजेरी लावत आनंदोत्सव साजरा केला.

Web Title: Patient Discussion Rajesh Kotecha