जुन्या नाशिकमध्ये दिवसाला चारशे रुग्ण पीडित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

जुने नाशिक - महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने पूर्व प्रभागात साथीच्या आजारांनी मोठे थैमान घातले आहे. त्यानिमित्ताने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दिवसाकाठी सुमारे 400 रुग्णांची विविध आजारांनी पीडित रुग्णांची तपासणी या ठिकाणी होत असल्याचे चित्र रुग्णालयात बघावयास मिळत आहे. 

जुने नाशिक - महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने पूर्व प्रभागात साथीच्या आजारांनी मोठे थैमान घातले आहे. त्यानिमित्ताने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दिवसाकाठी सुमारे 400 रुग्णांची विविध आजारांनी पीडित रुग्णांची तपासणी या ठिकाणी होत असल्याचे चित्र रुग्णालयात बघावयास मिळत आहे. 

शहरात डेंगीच्या आजाराने मोठे थैमान घातले आहे. विशेषत: पूर्व विभागात डेंगीच्या आजाराने पीडित रुग्णांची संख्या जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चार दिवसांत वडाळा नाका, राजवाडा व भारतनगर अशा भागातील दोन रुग्णांचा डेंगीने मृत्यू झाला होता. तसेच 1 ते 28 सप्टेंबरच्या दरम्यान सुमारे 224 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील नऊ रुग्णांना डेंगीची लागण झाल्याचे आढळून आले होते. 

दुसरीकडे अन्य आजारांनी पीडित रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे समोर येत आहे. दररोज सुमारे 350 ते 400 रुग्णांची तपासणी डॉक्‍टरांकडून केली जात आहे. त्यातील सुमारे 150 रुग्णांचे पेशीच्या कमतरतेमुळे त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येत आहे. त्यातील पाच रुग्ण डेंगी संशयित आढळून येत आहेत. त्याचप्रमाणे शहरी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या सर्व्हेत सुमारे सात रुग्ण असे सुमारे 10 ते 12 रुग्णांचे डेंगी संशयित असल्याचा अहवाल पुढील तपासणीसाठी मुख्यालयास सादर करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ मलेरिया व टायफॉइडचे रुग्ण अधिक असल्याचेही समोर येत आहे. 

खासगी रुग्णालयातील तपासणीमुळे संभ्रम 
डेंगी संशयित रुग्णांची आयजीजी, आयजीएम, एनएसआय अशा तीन प्रकारच्या नमुन्यांची तपासणी होणे आवश्‍यक आहे. या तिन्ही तपसण्यांचा अहवाल जर सारखा येत असेल तर त्या रुग्णास डेंगीची लागण झाल्याचे निश्‍चित होत असते. त्यानंतर डेंगी आजारासंदर्भातील औषधोपचार केले जातात. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयात मात्र या तिन्ही तपासण्यांपैकी एनएसआय ही एकच तपासणी करत संशयित रुग्णास डेंगीची लागण झाल्याचे निश्‍चित केले जात असते. त्यामुळे खासगी तपासणी व शासकीय प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालात साम्य आढळून येत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असतो. 

28 दिवसांत 224 संशयित डेंगी रुग्ण 
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय - 25 
खासगी रुग्णालये - 87 
शहराबाहेरील रुग्ण - 42 
प्रत्यक्ष भागात आढळून आलेले रुग्ण - 70

Web Title: patient suffering in Nashik