आईच्या दशक्रिया विधीचा पैसा वृद्धाश्रमाला

जगन्नाथ पाटील
सोमवार, 7 जानेवारी 2019

कापडणे (जि. धुळे) - समाजातील विवाह, दशक्रिया विधी आदींबाबतच्या पारंपरिक रूढी-परंपरांना छेद देण्यास सहजासहजी कोणी पुढे येत नाहीत. मात्र येथील अनिल पुंडलिक पाटील यांनी आई कलाबाई पाटील  यांच्या दशक्रिया विधीनिमित्त भाऊबंदकीसह गावपंगत न देता थेट वृद्धाश्रम व अपंग शाळेला सोलर हिटर, सगळ्यांना कपडे व भोजन दिले. यासाठी ५० हजारांवर खर्च केला. पाटील व त्यांच्या पत्नी अलका पाटील या शिक्षक दांपत्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

पाटील दांपत्यातर्फे नगाव (ता. धुळे) येथील आनंदविहार वृद्धाश्रम व अपंग शाळेला सोलर हिटर भेट देण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत भदाणे तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

‘प्राच्यविद्यापंडित पाटील यांचा चालवितो वारसा’ 
एखाद्या कुटुंबातील विवाहासह दशक्रिया विधीच्या दिवशी गावभोजन देण्यावर मोठा खर्च केला जातो. हा खर्च गरीब कुटुंबालाही करणे भाग पडत आहे. यातून अनेक जण कर्जबाजारी झाले. प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांच्या विचारांतून आम्ही ही प्रेरणा घेतली, असे अनिल व अलका पाटील यांनी  सांगितले.

Web Title: Patil familygifted Solar Hitter to Anand Vihar Vriddhhram and Handicapped school